शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

‘पेसा’च्या ५६.२४ कोटींतून उत्थान; आदिवासींसाठी विकासकामे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 2:09 AM

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.

- नारायण जाधवठाणे : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.पेसा ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील आदिवासीपाड्यांच्या उत्थानासाठी आदिवासी विकास विभागाकडून हे दरडोई लोकसंख्येनुसार अनुदान देण्यात येते. यानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाने २१४ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांची तरतूद केली होती. यातून हे अनुदान ठाणे-पालघर जिल्ह्यांतील पेसा ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.यात ठाणे जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ४०४ आदिवासीपाड्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या १ लाख ७९ हजार ५६२ लोकसंख्येकरिता ८ कोटी ७१ लाख १७ हजार रुपये देण्यात आले आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासीपाड्यांत राहणाºया ९ लाख ७९ हजार ५६३ लोकसंख्येकरिता ४७ कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये दरडोई ४८५.१६ रुपयांप्रमाणे देण्यात आले आहेत. या माध्यमाचा आदिवासींना फायदा होणार आहे.तालुकानिहाय आदिवासी गावपाडे- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १०१ आदिवासी गावपाडे, भिवंडीच्या ३९ ग्रामपंचायतींच्याक्षेत्रातील ७२ आणि शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २८० आदिवासी गावपाड्यांचा यात समावेश आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७७ आदिवासी गावपाडे, तलासरीच्या ४१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ६१, पालघरच्या१०८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७१, वसईच्या ६४ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ७६, मोखाड्याच्या २७ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ५६, जव्हारच्या ५० ग्रामपंचायतींतील १०८, वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींतील १६८ आणि विक्रमगड तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ९३ अशा ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासी गावपाड्यांचा समावेश आहे.लोकसंख्येचे प्रमाणयात ठाणे जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या ४ लाख ५३ हजार ७६६ असून, त्यात आदिवासींची लोकसंख्या १ लाख ७९ हजार ५६२ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३९.५७ टक्के आहे, तर पालघर जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या १३ लाख २४ हजार ५७ असून, त्यात ९ लाख ७९ हजार ५६३ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७३.९८ टक्के आहे.

टॅग्स :thaneठाणे