शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दंडाच्या पावतीवर फोटो एका ठिकाणचे तर कारवाई दुसरीकडची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 1:07 AM

वाहतूक पोलिसांचा नवा प्रताप : टार्गेटसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होते फोटोंची देवाणघेवाण

ठाणे : ई-चलन प्रणाली सुरू झाल्यापासून वाहतूक पोलीस मोबाइल फोनवर बेशिस्त वाहनांचे फोटो काढून कारवाई करतात .मात्र, ती कारवाई करताना टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका वाहतूक पोलिसांकडून दुसऱ्या पोलिसाला व्हॉट्सअ‍ॅपवर काढलेल्या फोटोंची देवाणघेवाण सुरू झाल्याने दंडाच्या पावतीवर फोटो एका ठिकाणचे आणि कारवाईचे ठिकाण भलतेच असे प्रकार दिवसेंदिवस ठाण्यात वाढू लागले आहेत. यामुळे रिक्षाचालकांपासून चारचाकी वाहनचालकांचे दंडाच्या रक्कमेने नाहक कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रकार वाहतूक पोलीस दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी करत असल्याचा आरोप आता दंडामुळे भडलेल्या चालकांकडून उघडउघड केला जात आहे. तर दुसरीकडे ,वाहतूक पोलिसांनी याबाबत असे प्रकार घडत नसल्याचे म्हटले आहे.

ई-चलन प्रणाली सुरू होऊन जवळपास दहा महिने झाले आहेत. त्यातच बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी ३०० ई-चलन मशीन १८ वाहतूक उपशाखांमध्ये वितरीत केल्या आहेत. यामध्ये नारपोली व मुंब्रा या उपशाखांना प्रत्येकी २०-२० तर कोपरी, विठ्ठलवाडी आणि कोनगाव या उपशाखांना प्रत्येकी दहा-दहा आणि उर्वरित उपशाखांना प्रत्येकी १५-१५ मशीनांद्वारे कारवाई सुरू आहे. यामुळे आता वाहतूक पोलीस व वाहनचालक यांच्यातील वादाचे प्रकार काही थांबले आहेत .परंतु, वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे पोलिसांमार्फत मोबाइलद्वारे फोटो काढून त्या-त्या वाहनचालकांना दंडाची पावती पाठवली जाते. त्यातूनच पोलिसांचा हा नवा प्रताप पुढे आला. यामध्ये पोलीस मोबाइलवर फोटो काढून. नंतर तो इतर वाहतूक उपशाखांमधील सहकाºयांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवतात. त्यानंतरत्याची पावती बनवून ती वाहनचालकांना पाठवण्यात येत आहे.ई-चलनामुळे वाहतूक पोलिसांची मलाई बंद झाल्याने प्रामाणिकपणे रिक्षा चालवणाºयांना त्यांच्याकडून त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणच्या रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांना हप्ते सुरू आहेत. त्या ठिकाणचे रिक्षाचालक या अशा कारवाईपासून अलिप्त राहत आहेत. वाहतूक पोलीस फोटो काढतात. त्याची पावती तातडीने येणे गरजेचे असते. पण, ती रात्री उशीरा येते. कधी-कधी तर ती पावती मध्यरात्री येते. हे प्रकार टार्गेट पूर्ण करण्यासाठी केले जात असल्यामुळे फोटो एका ठिकाणचे आणि कारवाईचे दाखवलेले ठिकाण भलतेच असल्याचे येणाºया पावत्यांवरून दिसत आहे.- रिक्षाचालक, ठाणे (नाव न छापण्याच्या अटीवर)बनावट नंबरप्लेटचे प्रकार वाढलेई-चलन प्रणाली सुरू झाल्यानंतर कारवाई वाचविण्यासाठी बनावट नंबरप्लेटचे प्रकार वाढले होते. त्या संदर्भात मध्यंतरी आरटीओ कार्यालयात चालकांकडून तक्रारी वाढण्यात सुरूवात झाली होती.अद्यापतरी असे प्रकार निदर्शनास आलेले नाहीत. महसूल गोळा करणे हे वाहतूक पोलिसांचे काम नसल्याने वाहतूक पोलिसांना कोणतेही टार्गेट दिले जात नाही, मात्र असे प्रकार होत असतील तर त्याबाबत माहिती घेतली जाईल.- अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Policeपोलिस