शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

ठाकुर्ली स्थानकातून लोकल सोडण्याचा आग्रह

By admin | Published: March 31, 2017 5:39 AM

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी स्थानकातील विविध समस्या प्रवाशांना

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी स्थानकातील विविध समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या समस्या तातडीने सोडवाव्यात, तसेच ठाकुर्ली लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भाजपा नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी लाक्षणिक उपोषण केले. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटकाजवळ नगरसेविका चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, भाजपा प्रभाग अध्यक्ष रवींद्र चौधरी, सुनील भगत, ज्येष्ठ नागरिक व महिला भरउन्हाचा तडाखा सहन करत दिवसभर उपोषणाला बसले होते. मात्र, रेल्वेचा एकही अधिकारी उपोषणस्थळी भेट घेण्यासाठी आला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले. कल्याण व ठाकुर्ली रेल्वे स्थानकांत ३० कोटी रुपये खर्च करून विकासकामे केली जात आहेत. जवळपास १७ कोटी रुपये खर्च करून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. स्थानकानजीक शहराच्या पूर्वेला मुंबईच्या दिशेने असलेला जुना पादचारी पूल अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे त्यावरून केवळ दोनच प्रवासी येजा करू शकतात. हा पादचारी पूल अत्यंत गैरसोयीचा आहे. स्थानकाच्या विस्तारीकरणात कल्याणच्या दिशेने सरकता जिना बसवण्यात येत आहे. पूर्वेला मुंबईच्या दिशेलाही सरकता जिना बसवावा, अथवा जुन्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण करावे. त्याचबरोबर ठाकुर्ली गावठाणात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महिला समिती शाळेशेजारून जाण्यायेण्याकरिता बायपास रस्ता तयार करावा, तसेच स्थानकातील फाटक बंद करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. स्थानकात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरून येणारी वाहने ठाकुर्ली रेल्वे फाटकातून डोंबिवली पश्चिमेला जातात. त्यामुळे फाटकाजवळ दोन्ही बाजूंना कोंडी होते. यामुळे सामान्य नागरिकांना फाटक ओलांडणे जिकिरीचे बनले आहे. तसेच फाटक बराच वेळ उघडे राहिल्यास त्याचा फटका लोकल आणि लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाला बसत आहे. दिवा येथे लोकवस्ती व प्रवासी वाढल्याचे कारण पुढे करत दिवा प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेने दिव्याला जलद लोकलना थांबा दिला. त्याचप्रमाणे जलद लोकलना ठाकुर्ली येथेही थांबा द्यावा. ठाकुर्ली स्थानक विस्तारीकरण करताना फलाट क्रमांक-१ला होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. त्यामुळे ठाकुर्ली लोकल सुरू करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.ठाकुर्ली पूर्व भागाच्या दिशेने रेल्वे मार्गाला समांतर पदपथ तयार करून दिल्यास प्रवासी व पादचारी यांना या मार्गाने कल्याणच्या दिशेने ठाकुर्ली परिसरात जाता येईल. त्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गाडीखाली सापडून प्रवासी मरण पावतात. त्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी) १२ वर्षांपासून लढा मागील १२ वर्षांपासून चौधरी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सोयीसुविधा व विकासासाठी पाठपुरावा करत आहेत. हा पहिला लढा जिंकल्यानेच ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होत आहे. आता प्रवासांच्या सोयीसुविधांसाठी पुन्हा दुसरा लढा सुरू केला आहे. त्यासाठी प्रवाशांनी हजारोंच्या संख्येने उपोषणस्थळी भेट देऊन स्वाक्षऱ्या करून चौधरी यांच्या उपोषणाला व मागण्यांना पाठिंबा दिला आहे. नागरिक व प्रवासी यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनास दिले जाणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.