ठाणे : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी नुकतेच ७५ व्या वर्षात पर्दापण केले. त्या निमित्ताने आजच्या तरुणाईची वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभिरूची वाढावी या उद्देशाने आगळावेगळा उपक्रम आयोजिला आहे. त्यात जागतिक थिएटर आॅलिम्पिक्समध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाटकांपैकी कोपनहेगन या नाटकाचा प्रयोग २० मार्चला ठाण्यात रंगणार आहे.महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेचे चेअरमन असलेले डॉ. काकोडकर यांनी ११ नोव्हेंबरला वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात प्रवेश केला. या निमित्ताने उद्बोधककार्यक्र म आयोजिला आहे. सध्या भारतात ८ वी जागतिक थिएटर आॅलिम्पिक्स स्पर्धा सुरू आहे. ‘मैत्रीचा झेंडा’ (फ्लॅग आॅफ फ्रें डशिप) ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ५१ दिवस चालणाºया स्पर्धेत ३० देशातील २५००० हून जास्त कलाकारांनी सहभाग घेतला आहे. याअंतर्गत एकूण १७ शहरातून ४५० हून अधिक नाटकाचे प्रयोग होणार आहेत. या स्पर्धेत मराठी भाषेचेही काही नाट्यप्रयोग सादर होतात. या मराठी भाषेतील प्रतिनिधित्त्व करणाºया काही निवडक नाटकांपैकी प्रत्यय हौशी नाट्यकला केंद्र कोल्हापूर यांनी सादर केलेले ‘कोपनहेगन’ हे नाटक २० मार्च रोजी गडकरी रंगायतन येथे दु. ४.३० वाजता होणार आहे. हा प्रयोग विनामूल्य आहे.डेन्मार्कमधील कोपनहेगनचा रहिवासी, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि विसाव्या शतकातील पदार्थ विज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचा जनक नील्स बोर आणि त्याचा शिष्य जर्मनीचा वेर्नर हायझेनबर्ग यांची दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना १९४१ साली भेट झाल्याचा उल्लेख इतिहासात आहे; पण या भेटीत नेमके काय घडले, काय चर्चा झाली, त्याचा जर्मन अणुबाँब निर्माण करण्याच्या प्रयत्नावर काय परिणाम झाला. याबद्दल एकवाक्यता नाही. इतिहासातील एखाद्या धुक्याप्रमाणे गूढ धूसर असणाºया या भेटीवर मायकेल फ्रायन यांचे ‘कोपनहेगन’ हे नाटक आधारलेले आहे.डॉ. शरद नावरे यांनी केला मराठी भावानुवाद‘कोपनहेगन’नाटकाच्या सादरीकरणातून समाज परिवर्तन होताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभिसरण व्हावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या मूळ इंग्रजी नाटकाचे लेखक मायकेल फ्रायन तर मराठी भावानुवाद डॉ. शरद नावरे यांनी केले आहे. दिग्दर्शन डॉ. शरद भुताडिया यांनी केलेले असून, मेघना खरे, सागर तळाशीकर व डॉ.शरद भुताडिया यांनी यात अभिनय केलेला आहे.
ठाण्यात रंगणार कोपनहेगन नाटकाचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:19 AM