- प्रज्ञा म्हात्रेठाणे - ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आता आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. याची सुरुवात त्याच्या किचनपासून करण्यात आली असून प्रशासनाने सोमवारी तेथे मनोरुग्णांसाठी बनविण्यात येणाऱ्या चपात्यांसाठी रोटीमेकर बसविले आहे.नुकतेच रुजू झालेले अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी मनोरुग्णालयात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मनोरुग्णांसाठी अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याचा त्यांचा उद्देश आहे. रुजू झाल्यानंतर त्यांनी किचन अद्ययावत करण्यावर भर दिला आहे. मनोरुग्णांसाठी रोज किचनमध्ये सकाळ व संध्याकाळ डाळ, भात, चपाती, दोन भाज्या बनविले जाते. या कामासाठी सध्या २३ स्वयंपाकी कार्यरत आहेत. मनोरुग्णालयात जवळपास १२०० मनोरुग्ण दाखल असून त्यांच्यासाठी रोज एकावेळच्या जेवणासाठी २५०० चपात्या बनविल्या जातात. आतापर्यंत आठ पुरूष स्वयंपाकी हे त्यांच्या हाताने या चपात्या बनवित होते. परंतु, आता त्यांच्या कामाचा भार हलका झाला असून या चपात्या रोटीमेकरमधून बनविल्या जात आहेत. सोमवारपासून रोटीमेकरच्या चपात्या मनोरुग्णांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ही सेमी आॅटोमॅटिक मशीन आहे. या मशीनमध्ये आटा बूनर आहे. यात आॅटोमॅटिक पिठाचा गोळा तयार होतो. मग हा गोळा मशीनमध्ये टाकून चपात्या तयार होतात.आहारतज्ज्ञाचे नियंत्रणतासाला ५०० चपात्या या रोटीमेकरमधून बनत आहेत. साधारण चार ते पाच तासांत २५०० चपात्या बनल्या जात आहेत.अशा दोन्ही वेळच्या पाच हजार चपात्यांचे नियोजन करण्याचे काम स्वयंपाकी करीत आहेत. आहारातज्ज्ञांच्या नियंत्रणाखाली हे कामचालत आहे.या मशीनचा रिझल्ट चांगला आला की दोन डबल रोटीमेकरची आॅर्डर दिली जाणार आहे, असे मनोरुग्णालयाकडूनसांगण्यात आले.
मनोरुग्णांच्या चपात्या यंत्राद्वारे, किचन होतेय अद्ययावत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 4:18 AM