लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ या ‘फायटर ड्रग्ज’चा ‘इसिस’ सारख्या अतिरेकी संघाटनांकडून मोठया प्रमाणात वापर होतो. त्यामुळेच त्याच्यावर बंदी आहे. याच फायटर ड्रग्जची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणा-या संतोष पांडे याच्यासह चौघांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पाच कोटींच्या किंमतीच्या ट्रामाडोलसह ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.ट्रामाडोल या केंद्र शासनाने बंदी घातलेल्या गुंगीकारक तसेच वेदनाशामक (पेन किलर) टॅबलेटसच्या तस्करीसाठी इंदोर (मध्यप्रदेश) मुंबईतील मयूर मेहतासह चौघेजण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, संजय शिंदे, उपनिरीक्षक अविनाश महाजन आणि रोशन देवरे यांच्या पथकाने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरातून मयूरला अटक केली. त्याच्याकडून ट्रामाडोल हायड्रोक्लोराइडच्या १२ लाख ७४ हजारांच्या टॅबलेटस हस्तगत केल्या असून त्याची आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सुमारे पाच कोटी इतकी किंमत आहे. मेहता पाठोपाठ रोमेल वाज (४९), संतोष पांडे (४१)आणि दीपक कोठारी (५२) या त्याच्या अन्य तीन साथीदारांनाही वेगवेगळया ठिकाणांहून सोमवारी अटक करण्यात आली. या चौघांनाही १ आॅक्टोंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. इंदोरमध्ये ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ हे ड्रग्ज बनविण्याची पांडे याची कंपनी आहे. रोमेल आणि दिपक हे या कंपनीचे मालक असून मयूर यात डिलीवरीचे काम करीत होता. इसिसचा प्रभाव असलेल्या दुबई, इराक आणि सिरियासारख्या देशांमध्ये ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ची मागणी मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे ठाण्यातून पकडलेल्या मयूरसह चौघांचे ‘इसिस’शी काही कनेक्शन आहे किंवा कसे? त्यादृष्टीने तपास सुरु असून ते नेमकी कोणत्या देशात कोणाकडे हे ड्रग्ज पाठविणार होते, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचेही प्रदीप शर्मा यांनी सांगितले..............................फायटर ड्रग्जचा वापर ‘इसिस’मध्ये सर्वाधिक‘ट्रामाडोल’ हे वेदनाशमक असल्यामुळे ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटना त्याचा वापर गोळीबार किंवा बॉम्बस्फोटामध्ये जखमी झाल्यानंतर मोठया प्रमाणात करतात. याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये एप्रिल २०१८ मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतासह अनेक देशांमध्येही त्यावर बंदी आहे.......................लंडनमध्ये दीड पाऊंडमध्ये १ टॅबलेटलंडनमध्ये या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’च्या एका टॅबलेटची किंमत दिड पाऊंड इतकी आहे. (१४३ रुपये) अशा नऊ हजार ८०० स्ट्रीप्स हस्तगत केल्यामुळे त्याची किंमत पाच कोटींच्या घरात असल्याची माहिती देवराज यांनी दिली.------------------------ठाण्यातही औषध विक्री केंद्रपरदेशात ट्रामाडोलची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या संतोष पांडे याने ठाण्यातील महात्मा फुलेनगरातही यूएस फार्मा सर्व्हिसेस या नावाने औषधविक्री केंद्र थाटले होते. तिथूनच त्याची ठाण्यासह देशविदेशांत या औषधाची विक्री सुरू होती, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे........................