कोरोना बाधीत रुग्णांसाठी कामगार हॉस्पीटलचा वापर करा, मनोज शिंदे यांचे महाापलिका आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:05 PM2020-06-16T17:05:12+5:302020-06-16T17:05:43+5:30

एकीकडे ठाणे महापालिका शहरात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विविध ठिकाणी रुग्णालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र वागळे इस्टेट भागात, कामगार रुग्णालय हे तयार असतांना त्या ठिकाणी कोवीड रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केली आहे.

Use of workers hospital for corona patients, letter from Manoj Shinde to Municipal Commissioner | कोरोना बाधीत रुग्णांसाठी कामगार हॉस्पीटलचा वापर करा, मनोज शिंदे यांचे महाापलिका आयुक्तांना पत्र

कोरोना बाधीत रुग्णांसाठी कामगार हॉस्पीटलचा वापर करा, मनोज शिंदे यांचे महाापलिका आयुक्तांना पत्र

Next

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून नवीन रुग्णालये उभारली जात आहेत. मात्र वागळे इस्टेट भागात कामगार हॉस्पीटल हे कोवीड रुग्णालय म्हणून का वापर केला जात नाही, असा सवाल कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आज शहरात विविध ठिकाणी मोकळी मैदाने इतर ठिकाणांचा शोध सुरु आहे. परंतु कामगार रुग्णालय हे अद्ययावत असल्याने त्याचा वापर तत्काळ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचा विचार केला गेला नाही तर कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
           ठाणे शहरात आजच्या घडीला पाच हजाराहून कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना आता रुग्णालये कमी पडू लागली आहेत. त्यामुळे, ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १ हजार खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. तसेच इतर ठिकाणी देखील मैदाने इतर जागांचा शोध सुरु आहे. परंतु हे सुरु होई पर्यंत रुग्णांची संख्या वाढणार आहे. तसेच, यासाठीचा खर्चही जास्तीचा आहे. त्यामुळे हा खर्च कोणासाठी, कोणाच्या फायद्यासाठी केला जात आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे अशा प्रकारे रुग्णालयाचा शोध घेतला जात असातांना वागळे इस्टेट भागात अद्ययावत असे कामगार रुग्णालय उभे आहे. चार मजली इमारतीत १ हजाराहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, कोरोनामुळे येथे इतर आजारांचे रुग्णही कमी संख्येत येत आहेत. येथे डॉक्टर आणि नर्सेस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासनाचा हा खर्च देखील वाचणार आहे. परंतु असे असतांनाही या रुग्णालयकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हेच रुग्णालय कोवीड रुग्णालय म्हणून वापरात आणता येऊ शकणार आहे. त्यामुळे याचा गांर्भीयाने विचार करुन हे रुग्णालय ताब्यात घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संपर्कमंत्री अस्लम शेख, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली जाणार आहे.
                   याबाबतीत तत्काळ निर्णय व्हावा म्हणून त्याचे टिव्ट देखील केले असल्याचेही त्यांनी सांगितले. हे रुग्णालय कोवीड साठी का ताब्यात घेतले जात नाही, याची स्पष्टता करावी, हे रुग्णालय कोवीडसाठी केव्हा पर्यंत खुले होईल याचेही उत्तर त्यांनी मागितले आहे. या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही मनोज शिंदे यांनी दिला.
 

Web Title: Use of workers hospital for corona patients, letter from Manoj Shinde to Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.