-----------
६३ कोरोनाबाधितांची वाढ
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी नव्या ३ कोरोनाबाधितांची भर पडली, तर २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीला ५४६ रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३७ हजार ३५८ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----------------------------------
बारा वाहनांची तोडफोड
कल्याण : पूर्वेकडील चिकणीपाडा परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील दोन तरुणांनी तेथील वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात दुचाकी आणि चारचाकी अशा १० ते १२ वाहनांचे नुकसान झाले. यात गुरुनाथ राऊत हा तरुण जखमी झाला असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-----------------------------------
मोबाइलची चोरी
कल्याण : येथील पूर्वेकडील भावेश चिकनकर हे चक्कीनाका परिसरातील मातोश्री निवास याठिकाणी राहतात. त्यांनी त्यांचा मोबाइल घराच्या कट्टयावर ठेवला असता चोरट्याने तो लंपास केल्याची घटना रविवारी संध्याकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------
मंगळसूत्र खेचले, पण निघाले बेंटेक्सचे
डोंबिवली : मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास येथील एमआयडीसी प्राजक्ता सोसायटीच्या समोर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ७२ वर्षीय लक्ष्मी माधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केले; परंतु सुदैवाने ते बेंटेक्सचे निघाले. त्यामुळे खोदा पहाड निकला चुहा याची चर्चा परिसरात रंगली आहे. दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात माधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-------------------------------------------