कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आतापर्यंत पाच लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक लाख ५२ हजार आहे.
मनपा हद्दीत हेल्थ वर्कर्स, फ्रंट लाइन वर्कर्स व १८ वर्षांवरील तीन लाख ९८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मनपाने जुलैमध्ये मोबाइल व्हॅनद्वारे झोपडपट्टी व चाळ परिसरात सुरू केलेल्या लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या लसीकरणाचा ३८ हजार ४८२ नागरिकांनी लाभ घेतला आहे. खासगी रुग्णालयांतून एक लाख ४१ हजार नागरिकांनी लस घेतली आहे, तर कामाच्या ठिकाणी ३५ हजार ५०६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
सरकारकडून लसीचा साठा पुरेसा उपलब्ध होत नसल्याने मनपाला लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होत नाही. मनपाने लसीकरणासाठी १३ लाख ५९ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मनपाची दररोज १०० लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याची तयारी आहे. मात्र, लसीअभावी ही १०० केंद्रे चालविणे शक्य नाही.
-------------------