डोंबिवली :
कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी लसींचा नवा साठा न आल्याने गुरुवारी उपलब्ध झालेल्या लसींच्या साठ्यातून केवळ सकाळच्या वेळी काही प्रमाणात लसीकरण झाले. दुपारनंतर अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. कल्याणमधील काही केंद्रांवर गुरुवारचा साठा शिल्लक असल्याने अर्धवेळ ते सुरू होते, परंतु डोंबिवलीत लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद होते.
महापालिका क्षेत्रात १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे असून त्यात महापालिका आणि खासगी अशा दोघांचा समावेश होतो. त्यापैकी डोंबिवलीत दोन्ही पद्धतीची केंद्रे बंद होती. सकाळी नागरिक केंद्रांवर गेले होते. त्यांना त्याठिकाणी `आज लसीकरण बंद` असल्याचे फलक बघायला मिळाल्याने माघारी परतावे लागले.
महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सात ठिकाणी लसीकरण काही वेळ सुरू होते. ती सर्व केंद्रे कल्याण परिसरात होती. त्या सर्व ठिकाणी सुमारे १५०० नागरिकांचे लसीकरण झाले. लस नसल्याने केंद्रे बंद ठेवावी लागल्याने नागरिकांची गैरसोय झाली असल्याचे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी मान्य केले. शुक्रवारी रात्री सुमारे सात हजार लसी उपलब्ध झाल्याने शनिवारी लसीकरण होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
---------------
फोटो आहे
........
वाचली