ठाणे : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खरीप पिकांसह शेतजमीन नुकसानीचे पंचनामे होण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यास अनुसरून मुरबाड तालुक्यातील काळू नदी परिसरातील पीकपंचनामे करण्याच्या दृष्टीने ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच या काळू नदीखोºयातील शेतकºयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी प्राधान्याने केल्याबद्दल शेतकºयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
‘पंचनाम्यासाठी शेतकºयांचे तहसीलदारांना साकडे’ या मथळ्याखाली लोकमतने २६ आॅगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध करून शेतकºयांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून तहसीलदारांनी कृषी विभागामार्फत काळू नदीच्या परिसरातील तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई, फांगळोशी, दिघेफळ, आंबिवली, चासोळे, खुटल (बा.), न्याहाडी, फांगणे, भोरांडे, उदाळडोह या महसुली गावासह कुंडाचीवाडी, भट्टीचीवाडी, भिकारवाडी, शिरसोनवाडी आणि वाकळवाडी आदी गावांमधील पीक व शेतजमीन पंचनामे हाती घेतले, तर बहुतांशी पंचनामे पूर्ण करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकºयांनी लोकमतचे आभार मानले.
अतिवृष्टीच्यावेळी काळू नदीसह नाल्याचे पाणी बहुतांश शेतात शिरले, तर काही दिवस पीक पाण्याखाली राहिल्यामुळे पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकºयांनी प्रशासनाकडे सतत हेलपाटे घातल्याचे येथील शेतकºयांकडून सांगितले जात आहे. अखेर, पीक व जमीन नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक बनकर मॅडम व वाघ यांनी केल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. यासाठी काळू प्रकल्प संघर्ष समितीचे पदाधिकारी पोपटराव पवार यांच्यासह रंगनाथ देशमुख, दामू ठाकरे, रामचंद्र देशमुख, पोलीस पाटील देशमुख, गुलाब देशमुख, विनोद चौधरी, दीपक देशमुख, नारायण देशमुख आदींनी लोकमतचे आभार मानले. शेती व पीक नुकसान झालेल्यांमध्ये तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई ,फांगळोशी, दिघेफळ, आंबिवली, चासोळ आदी गावांतील शेतकºयांचा समावेश आहे.२५० हेक्टर शेती बाधितच्मुरबाड तालुक्यातील काळू नदी परिसरातील ३० ते ४० हेक्टर भातपिकासह २५० हेक्टर शेतजमीन बाधित झाल्याचा अंदाज शेतकºयांकडून व्यक्त केला जात आहे.च् सुमारे २६० पेक्षा अधिक शेतकºयांचे नुकसान झालेले असल्याचे सांगितले जात आहे.