शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
3
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
4
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
5
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
6
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
7
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
8
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
10
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
11
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
12
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
13
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
14
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
15
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
16
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
17
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
18
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
19
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
20
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

भार्इंदरमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये झाली हाणामारी

By admin | Published: August 19, 2016 1:49 AM

मीरा- भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पश्चिम उड्डाणपुलाजवळील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातील धुमसत असलेल्या अंतर्गत वादाचे पर्यावसान अखेर हाणामारीत झाले.

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पश्चिम उड्डाणपुलाजवळील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातील धुमसत असलेल्या अंतर्गत वादाचे पर्यावसान अखेर हाणामारीत झाले. एका ज्येष्ठ नागरिकाने अरेरावी आणि धक्काबुक्की करत दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ढकलून दिल्याने डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने उड्डाणपुलाजवळील उद्यानात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधले. ते भार्इंदर ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळास व्यव्स्थापनासाठी जुलै २०१३ मध्ये चालविण्यास दिले. सुमारे पावणेसहाशे सदस्य असलेल्या संघाचे अध्यक्ष विजय कणेरकर तर सचिव बाळकृष्ण तेंडुलकर आहेत. विरंगुळा केंद्रात व समोरील आवारात ज्येष्ठांसाठी विविध खेळ, वृत्तपत्र, टीव्ही यांची सोय आहे. पण वर्षभरापासून शुक्ला व कृष्णकुमार दमानी यांनी केंद्राच्या आवारात विनामूल्य योग वर्ग सुरु केले. पण त्यात ज्येष्ठ नागरिकांऐवजी तरुण, महिला यांचीच संख्या मोठी असल्याचा आक्षेपही घेतला होता. सायंकाळीच योगाचे वर्ग घेतले जात असल्याने बॅडमिंटन खेळणे बंद झाले आहे. तत्कालिन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडेही याबाबत चर्चा होऊन त्यांनी स्वत: पाहणी केली होती. पण ठोस भूमिका वा निर्णय न घेतल्याने अंतर्गत वाद घुमसतच होता. बुधवारी सायंकाळी संघाच्या पाच खुर्च्या पुन्हा जागेवर न ठेवल्याबद्दल सदस्य मुरारीलाल जोगानी (६९) यांनी दमानी यांना विचारणा केली. त्याचा राग येऊन खुर्च्च्या ठेवणार नाही, तुम्ही कोण सांगणारे अशी अरेरावी करत दमानी यांनी जोगानी यांना जोराने ढकलून दिले. त्यामुळे पायरीची कडा लागल्याने जोगानी यांच्या डोक्याला जबर मार लागला. या घटनेनंतर दमानी पळून जात असताना डॉ. राधे गोयल या ज्येष्ठ नागरिकाने त्यांना अडवले. दरम्यान, गोयल व अन्य ज्येष्ठ नागरिकांनी जोगानी यांना पालिकेच्या पं. जोशी रुगणालयात नेले. त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. जोगानी यांच्या तक्रारीनंतर भार्इंदर पोलिसांनी दमानीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात चिंतेचे तसेच भीतीचे वातावरण आहे. संघाचे सदस्य योगा वर्गात सहभागी नसतानाही संघाच्या ५० सतरंजी-चटईसह १० खुर्च्या शुक्ला, दमानी वापरत आहेत. पण जोगानी यांना अरेरावी करत त्यांना ढकलून जखमी केल्याचा प्रकार गंभीर आहे. आता तरी महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांबाबत योग्य भूमिका घ्यावी अशी अपेक्षा तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)ठोस निर्णय न घेतल्याचा फटका तत्कालिन महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी केवळ ज्येष्ठ नागरिक व योग्य बाजू पाहून ठोस निर्णय घेतला असता तर ही घटना घडली नसती असे सिताराम नाईक म्हणाले. वेळेवरुन होते वादस्थानिक नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांनीही योगावर्गाच्या वेळेवरुन वाद होते असे सांगत दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना वेळ ठरवून दिली होती. बुधवारी आपण तेथे नसल्याने घडलेल्या घटने बद्दल बोलणे योग्य नाही असे सांगितले.