३) अशी वाढली महागाई
महागाईमुळे सगळ्याच वस्तूंच्या दरांत वाढ झाली आहे. सध्या सण-उत्सवाचा काळ असल्याने साखर जास्त चर्चेत असल्याचे किराणाविक्रेत्या पूनम मोरे यांनी सांगितले.
जानेवारीतील दर-सध्याचा दर (प्रतिकिलो रुपयांत)
शेंगदाणा तेल ३००-३५०
शेंगदाणे १०५ ते ११०- १२० ते १३०
साखर ४०-४५
साबुदाणा ७५ - ८० ते ९०
चहापुडा १३०-१३५
तूरडाळ ११०ते१२०-१३० ते १४०
मूगडाळ ११० ते १२०- १३० ते १४०
उडीद डाळ ११० ते १२० - १३० ते १४०
हरभरा डाळ ७० ते ८०- ९० ते १००
४) सिलिंडर हजाराच्या घरात
सिलिंडरचे दर दुपटीपेक्षा वाढले आहेत. घरगुती गॅसचे दर ४०० ते ४५० रुपये होते. आता हा गॅस ९५० रुपयांना, तर व्यावसायिक गॅस ९०० रुपयांवरून एक हजार ६०० रुपये झाला आहे.
५) घरातले बजेट बिघडले आहे; पण पोळीभाजी केंद्र चालविणाऱ्यांनाही खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण जात आहे. त्यामुळे त्यांनाही अन्नपदार्थांचे थोडेफार दर वाढवावे लागले आहेत.
- प्रशांत ठोसर, दुकानमालक
गृहिणी तर महागाईमुळे होरपळून निघत आहेत. नेमके कशी आणि कुठे बचत करावी, असा प्रश्नच पडला आहे. बचत आता होतच नाही.
- शुभांगी मोरे, गृहिणी