शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठाण्यांत रंगणार ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’

By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 09, 2023 5:41 PM

ठाणेकर अनुभवणार माउलींच्या पालखीचा अश्वरिंगण सोहळा.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ओबीसी एकीकरण समिती, महराष्ट्र, ओबीसी प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघ, ठाणे यांंच्यावतीने ठाणे शहरातील कोर्ट नाका येथे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माऊलींच्या पालखीचा अश्वरिंगण सोहळा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. 

टाऊन हॉल येथे ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडणार आहे. यावेळी, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील नामवंत मंडळी एकत्र उपस्थित राहून एक ‘अद्भूत सोहळा’ ठाणेकरांना पाहता येणार आहे अशी माहिती आयोजक मराठा सेवा संघ,ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे व ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी केले आहे.

‘अवघाचि संसार करिल निधार्र। नामाचा गजर सर्वकाळ॥ या संत नामदेव महाराजांच्या ओवीमध्ये भुतलावर राहणार्‍या प्रत्येक सुखी संसाराची काळजी वाहिलेली दिसते. यामध्ये समतेचा, विश्व बंधुत्वचा आणि कुटुंब व्यवस्थेचा आनंदी संदेश सहजासहजी पोहचतो. या विचारातून प्रेरीत होत समाजातील सर्व घटकांना ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ या संकल्पनेतून एकत्र जोडण्याचं कार्य ठाण्यात शनिवारी आयोजित सोहळ्यानिमित्त होणार आहे. यावेळी कोर्ट नाका येथे शासकीय विश्रामगृहाजवळून वारकरी मंडळींच्या वारीला सुरूवात होईल. महिला, पुरुष, मुले पारंपारिक वेशभुषेत हातात दिंड्या - पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, रस्त्यावर रांगोळीचा सडा अशा मंगलमय वातावरणात टाळ-मृदूंगाचा गजर करत वारकरी पुढे सरकतील.

त्यानंतर टॉउनहॉलजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत जवळच उभारलेल्या श्री विठ्ठलाच्या पुर्णाकृती पुुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून सहभागी सर्व सामाजिक संस्था, वारकरी मंडळी आपल्या विविध मागण्यांचे, समस्यांची शिदोरी (पत्र) सोडून ती विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून मायबाप सरकारकडे गार्‍हाणे मांडणार आहेत. ती पत्रे जिल्हाधिकारी, ठाणे यांंच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.

टॅग्स :thaneठाणे