- नितीन पंडितभिवंडी - कोकण पदवीधर मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी शुक्रवारी भिवंडीत पदवीधर मतदार संघाच्या नाव नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी कोकण पदवीधर मतदार संघात ठाणे जिल्हा महत्वाची भूमिका बजावणार असून,भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मोठी आहे त्यासाठी युवासेने सह सर्व शिवसैनिकांनी पदवीधर मतदार संघातील मतदार नावनोंदणी साठी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना तथा युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर भिवंडी शहापुर ग्रामीण जिल्हा प्रमुख विश्वास थळे,भिवंडी जिल्हा प्रमुख मनोज गगे,उपजिल्हा प्रमुख तुळशीराम पाटील,प्रकाश भोईर,युवासेना जिल्हाध्यक्ष ऍड अल्पेश भोईर,सोन्या पाटील,भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटील, तालुका प्रमुख कुंदन पाटील, महिला ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक कविता भगत,शहर महिला संघटक वैशाली मेस्त्री,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मंजुषा जाधव,तालुका महिला संघटक फशिताई पाटील,जिल्हा सचिव जय भगत,तालुका सह संपर्क सचिव अरुण पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही निवडणुक संघटनेसाठी महत्वाची असून संघटनेची कार्यकर्त्यांची निवडणुक म्हणून ही ओळखली जात असल्याने शिवसैनिक किती क्षमतेने काम करीत आहेत हे या मतदार नाव नोंदणी वरून स्पष्ट होईल असे सांगत मतदार नाव नोंदणीसाठी वेळ कमी आहे ,त्यासाठी मुदतवाढ मिळेल की नाही हे सांगता येत नाही त्यासाठी हाती राहिलेल्या वेळेत जास्तीत जास्त मतदार नावनोंदणी करणे गरजेचे आहे ,त्यासाठी शाखा प्रमुखासह सर्व पदाधिकारी यांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे आवाहन देखील सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी युवासेना जिल्हाध्यक्ष ऍड अल्पेश भोईर यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात किमान २० हजार पदवीधर मतदारांची नोंद करणार असल्याचे सांगितले तर युवासेना पदाधिकारी राजू चौधरी,युवासेना तालुकाध्यक्ष पंकज घरत ,युवासेना भिवंडी शहर अधिकारी सुरेंद्र गुळवी,मोहन पठाडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.तर कार्यक्रमाच्या शेवटी वरुण सरदेसाई यांनी संपूर्ण भिवंडी लोकसभेतील तालुका, शहर व विधानसभा नुसार कोकण पदवीधर निवडणूक नोंदणी संदर्भात प्रत्यक्ष पदाधिकारी यांच्याशी बोलून आढावा घेतला आहे.