शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

वसई डेपोतील शहरी एसटी वाहतूक बंद

By admin | Published: January 03, 2017 5:30 AM

एसटी महामंडळाने अखेर नालासोपारा आणि वसई डेपोतून सुरु असलेली शहरी बसवाहतूक रविवारपासून पूर्णपणे बंद केली. वसई विरार महापालिकेने या मार्गावर बससेवा

शशी करपे , वसईएसटी महामंडळाने अखेर नालासोपारा आणि वसई डेपोतून सुरु असलेली शहरी बसवाहतूक रविवारपासून पूर्णपणे बंद केली. वसई विरार महापालिकेने या मार्गावर बससेवा सुरु करण्यास ठाम नकार दिल्याने सोमवारपासून प्रवाशांचे हाल सुरु झाले. एसटी वाचवण्यासाठी वसईत सर्वपक्षीयांची एकजूट झाली असून मंगळवारपासून आंदोलन सुुरु केले जाणार आहे. तर पालकमंत्र्यांची विनंती परिवहन मंत्र्यांनी धुडकावल्याने भाजपाने सोमवारी धरणे आंदोलन करून आंदोलनात उडी घेतली. वसई विरार महापालिकेने २०१२ मध्ये परिवहन सेवा सुरु केल्यानंतर एसटीने धोरणानुसार टप्याटप्याने शहरी बस वाहतूक बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीने २१ सप्टेंबरपासून वसई आणि नालासोपारा डेपोतील २१ मार्गावरील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी महापालिकेने बसेसची संख्या कमी असल्याचे कारण सांगून बससेवा तूर्तास सुरु करण्याची विनंती एसटी महामंडळाला केली होती. त्यानंतर एसटीने सेवा सुरु ठेवली होती. आता एसटीने १ जानेवारीपासून २१ मार्गांवरील बससेवा पूर्णपणे बंद केली आहे. महापालिकेने डेपो आणि बसेसची उपलब्धता नसल्याचे सांगून ही बस सेवा सुरु करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून गावागावातून मुंबईला कामावर जाणाऱ्यांची आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय सुुरु झाली आहे. त्यातून याभागातील वातावरण तापू लागले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून सर्व बस स्टँडवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील बससेवा सुरु रहावी यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, ग्रामीण अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मंत्रालयात भेट घेतली होती. त्यावेळी रावते यांनी बससेवा सुरु ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. नियमाविरोधात महामंडळ बस सेवा सुरु ठेवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिका बससेवा सुरु करायला तयार नाही. लोकांचे हाल होणार असल्याने तोडगा निघेपर्यंत बसेस सुरु ठेवण्याची विनंती केली होती. असे असतांनाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पालकमंत्र्यांची विनंती धुडकावत बससेवा बंद केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, बस वाहतूक सुरु रहावी यासाठी भाजपाने महापालिका आयुक्त सतीश लोखडे यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यांनीही नकार दिल्याने या मार्गावर कोणतीही बससेवा सुरु झालेली नाही. गैरसोय लक्षात घेऊन काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, भाजपाचे उपाध्यक्ष मनोज पाटील, जनआंदोलन समितीचे मिलिंंद खानोलकर, सायमन मार्टीन यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते. बैठकीत एसटी बचाव आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाने सोमवारी सकाळी जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आंदोलनात उडी घेतली. भाजपाचे शिष्टमंडळ मंगळवारी पालकमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून बस वाहतूक सुरु रहावी यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांकडून कोणताही तोडगा निघाला नाही तर सर्वपक्षीय एसटी बचाव आंदोलन समिती बुधवारपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती समितीच्या डॉमनिका डाबरे यांनी दिली.