वसई : जागतिक मराठी भाषादिनानिमित्त वसईत मराठीचा जागर करण्यात येणार असून ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही शाळांमध्ये जाऊन साहित्यिक आणि कवी विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी प्रवोधन करणार आहेत. ज्ञानपीठ पुरस्काप्राप्त कवीवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वसईत रविवारी सायंकाळी ५ वाजता वाघोली येथील शनी मंदिर सभागृहात साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्र्फेे मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पु. द. कोडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी भारत दौंय्ऋ हे प्रमुख वे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक यावेळी प्रमुख पाहुणे असणार आहेत. ज्येष्ठ कवी डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. पल्लवी बनसोडे संगीता सेरेजो, भारती देशमुख, सुरेखा धनावड,े अॅड. रमाकांत वाघचौडे, महादेव इरकर, हरिहर बाबरेकर आदी विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी प्रवोधन करणार आहेत. निर्मळ येथील जीवन विकास मंडळ’ संचालित ’चेतना पुस्तकालयामार्फत टिव्ही-चित्रपट माध्यमामुळे मराठीला सध्या बरे दिवस?’ ह्या विषयावर मराठी भाषेचे प्राध्यापक तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक श्री. चंद्रकांत पवार ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोली भाषेतील काव्य वाचनात सहभागी स्थानिक कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. रविवार २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता मंडळाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व दर्दी रसिकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुनील रॉड्रिग्ज यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वसईत जागर मराठीचा
By admin | Published: February 25, 2017 3:01 AM