जान्हवी मोर्ये।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पावसाचा जोर वाढल्याने शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. कल्याणच्या कृ षी उत्पन्न बाजार समितीत रविवारी सकाळी कोथिंबीरचा भाव २५० रुपये जुडीला होता. दहा वाजल्यानंतर तोच भाव ४०० रुपये जुडी झाला होता, असे किरकोळ भाजीविक्रेता संदीप सिंग यांनी सांगितले. भाज्यांच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज अंदाजे दोन ते अडीच हजार क्विंटल माल कमी येत आहे. त्यामुळे भाज्यांच्या कि मती वाढल्याची माहिती बाजार समितीचे सचिव यशवंत पाटील यांनी दिली. डोंबिवलीच्या बाजारातदेखील भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. रविवारी भाज्यांचे भाव अचानक वाढले. शनिवारपर्यंत भाज्यांचे भाव आटोक्यात होते. भाज्यांचे भाव वाढलेले असले तरी, ग्राहक खरेदी करीत आहेत. काही ग्राहक आपल्या पसंतीच्या भाज्या खरेदी करतात, तर काही ग्राहक भाज्यांचा दर पाहून खरेदी करतात. आम्ही मात्र भाज्यांचे भाव वाढल्याने माल कमी आणला. एरव्ही साडेसात किंवा दहा कि लो माल खरेदी करतो. पण आज अडीच किलो ते पाच किलोपर्यंतच भाज्या आणल्या आहेत. फरसबी, मटार, आले, हिरवी मिरची, मेथी आणि कोंथिबीर यांच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. भेंडी, चवळीच्या शेंगा, मोठी वांगी, छोटी वांगी, गवार, तोंडली, दुधी या भाज्यांचे भाव कि रकोळ बाजारात स्थिर आहेत.ठाण्यातही दरवाढ! गरिबांच्या जेवणातून भाजीपाला गायबठाणे : गेल्या दोन तीन दिवसांपासून ठाण्यात कोथिंबीरची जुडी २00 रुपयांच्या पुढे गेली असून, फ्लॉवरनेही शंभरीचा उंबरठा गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाहतुकीदरम्यान पावसामुळे भाजीपाला सडत असल्याने पालेभाज्यांबरोबर फळभाज्यांचेही दर वाढल्याची माहिती ठाण्यातील काही भाजीविक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मागील आठवड्यात पावसाचा जोर एवढा होता की, मुंबई महानगर परिसरात शासनाला सार्वजनिक सुटी जाहीर करावी लागली. या पावसाचा परिणाम आता भाजीपाल्याच्या भावावर झाला आहे. पावसामुळे विक्रेत्यांचा निम्मा माल वाहतुकीदरम्यानच खराब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत.या भाववाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ही भाववाढ थोडीथोडकी नसून, तब्बल दहापटीपेक्षाही जास्त आहे. एरव्ही ३0 ते ४0 रुपयांना मिळणारी कोथिंबीरची जुडी रविवारी तब्बल २५0 रुपयांना विकली जात होती. शेपू, गवार आणि फ्लॉवरसारख्या इतर भाज्यांचीही तीच परिस्थिती आहे. याचा परिणाम लहानमोठ्या हॉटेल्समधील भाज्यांच्या दरावरही झाला आहे.दरवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जेवणातून बहुतांश हिरव्या भाज्या गायब झाल्या आहेत. वाहतुकीदरम्यान भाजीपाला खराब होत असल्याने विक्रेतेही माल कमीच बोलवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणीएवढा मालाचा पुरवठा सध्या तरी होत नाही. चवळी तर बाजारात मिळतच नाहीये. भाज्यांची बाजारात आवक चांगलीच कमी झाली आहे.भाजीपाल्याची आवक जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत भाव वाढलेलेच राहू शकतात, असे पालेभाज्यांचे ठाण्यातील विक्रेते निवृत्ती क्षीरसागर यांनी सांगितले. भाववाढीमुळे बरेचसे ग्राहक भाजीपाला घेण्यास धजावत नाही. २०० ते २५० रुपये जुडीने कोथिंबीर कोणीही विकत घेणार नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात मोठ्या जुडीच्या छोट्या जुड्या करून विक्रेते विकत आहेत, असे भाजीविक्रेते संभाजी खेडेकर यांनी सांगितले.
पावसाने भाजीपाला महागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:41 PM