ठाणे : भोगीनिमित्त केल्या जाणाऱ्या मिश्र भाजीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत मटार, गाजर, हरभरा यांची भरपूर आवक झाल्याने बाजरपेठा हिरव्यागार झाल्या आहेत. बुधवारपासूनच या भाज्यांची आवक वाढली सून ती नेहमीपेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. भाज्यांच्या दरातही २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.पौष महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीनिमित्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, लोणी यासोबतच चवीने खाल्ली जाते ती मिश्र भाजी. त्यासाठी लागणारे मटार, वांगी, पावटे, गाजर, हरभरे यांनी ठिकठिकाणचे बाजार सजले आहेत.यातील हरभरे, गाजर यांचा समावेश सुगड पूजनाताही होतो. शिवाय काळ््या रंगाचा ऊस, भूईमुगाच्या शेंगा, बोरे याही बाजारात आल्या आहेत. यातील भाज्यांचे भाव किलोमागे किमान दहा रुपयांनी वाढल्याचे विक्रेते रमेश वर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भोगीनिमित्त भाज्यांच्या दरात सुगी
By admin | Published: January 12, 2017 7:03 AM