ठाणे : पावसाळा सुरु होऊन आज दोन महीने संपायला आले तरी देखील आजपर्यंत ठाण्याच्या घोड़बंदररोड रस्त्यावर पडलेले खड्डे बुझवले गेले नाहीत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक दू-चाकी चालकांचे प्राण आजपर्यंत गेले आहेत. दू- चालाक खड्डे वाचवण्यासाठी अचानक वाहन धीम्या गतीने करतात तर काही अचानक ब्रेक मारतात , खड्ड्यातून दू चाकी गेली तर त्या व्यक्तिचा तोल जातो आणि दुसऱ्या चार चाकी वहानाच्या खाली येऊन त्या दू-चाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यु होतो .
घोडबंदररोड वरील रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांबाबत पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता असे समजले की आजपर्यंत हा रास्ता MSRDCच्या अत्यारित होता. पण आता हा रस्ता P W D कडे सोपवण्यात आला आहे.
सर्वप्रथम पीडब्ल्यूडी D.E. सचिन पाटिल यांच्याशी बोललो असता त्यानी असे सांगितले की, हा रस्ता आताच आमच्याकडे आला आहे. आगोदर एमएसआरडीसीकडे होता , खड्डे भारायचे काम आता सुरु आहे .हे काम एक महिन्यात पूर्ण होईल . ठाणे PWD SE - कांबळे यांच्या सोबत मेसेज वर बोललो असता यानी आज रात्री पर्यन्त काम पूर्ण होईल असा मेसेज पाठवला. नक्की कोणाचे खरे मानायचे नक्की कळत नाही की, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा जीव असाच टांगणीला ठेवायचा समजत नाही.