शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

गोल्डन गँगने घेतला बळी

By admin | Published: May 19, 2017 4:04 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काही भ्रष्ट व लाळघोटाळे उच्चपदस्थ अधिकारी आणि माफिया टोळीप्रमाणे वर्तणुक असलेले सर्व पक्षांमधील काही मोजकेच

- प्रशांत माने। लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काही भ्रष्ट व लाळघोटाळे उच्चपदस्थ अधिकारी आणि माफिया टोळीप्रमाणे वर्तणुक असलेले सर्व पक्षांमधील काही मोजकेच पण प्रमुख नेते यांनी संगनमताने आयुक्त ई. रवींद्रन यांना काम करु दिले नाही. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांत त्यांची या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. सुरुवातीला कामांचा धडाका लावणारे हेच का ते रवींद्रन असा प्रश्न पडावा इतके शैथिल्य त्यांच्यात कशामुळे आले, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.रवींद्रन यांची नवी मुंबईतील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता या विभागाच्या आयुक्तपदी गुरूवारी तडकाफडकी बदली झाली. आपली बदली झाल्याचे त्यांना समजले तेव्हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक सुरु होती. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनाही रवींद्रन यांच्याकरिता बदली हा मानसिक धक्का असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील नैराश्यातून जाणवले.कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये नागरी समस्यांचा डोंगर असतानाही येथील महापालिकेला हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आयएएस अधिकारी लाभले. यात युपीएस मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंह या सनदी अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत या शहरांना खऱ्या अर्थाने विकासाचा स्पर्श लाभला. यानंतर लाभलेल्या पदोन्नतीधारक आयुक्तांना फारशी उजवी कामगिरी करता आली नाही. आयएएस अधिकाऱ्यांची घटलेली संख्या आणि राज्यातील महापालिकांची वाढलेली संख्या यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन शासनाने ‘ड’ वर्गातील महापालिकांच्या आयुक्तपदी मुख्याधिकारी संवर्गातील ज्येष्ठ अधिकारी आयुक्तपदी नेमण्यास सुरुवात केल्याने पाणी, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, रस्ते या समस्या ‘जैसे थे’ राहील्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेला आयएएस दर्जाचा अधिकारी लाभावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्याची पूर्तता रवींद्रन यांच्याकडे जुलै २०१५ मध्ये केडीएमसीचा कार्यभार सोपविण्यात आल्याने झाली. रवींद्रन यांनी पदभार स्वीकारताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीम वर्क च्या माध्यमातून महापालिकेचा कारभार चालेल, अशी घोषणा केली. भल्या पहाटे सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडवर धाडी घालणे, कल्याण रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालना देणे, शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या महत्वाच्या रस्त्याचे रूंदीकरण या त्यांच्या कामाने त्यांनी विशेष छाप पाडली. रस्तारूंदीकरणाच्या धडाकेबाज मोहिमेत दस्तुरखुद्द गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहून खो घातल्याने रवींद्रन आल्याने चाप बसलेले भ्रष्ट अधिकारी व हितसंबंधी नगरसेवक यांच्या गोल्डन गँगला निष्कारण बळ लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे रवींद्रन हे रुंदीकरणाची मोहीम पार पाडण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आहेत अशी चर्चा रंगली होती. आयुक्तांनी शहर विकासाचे, प्रशासनातील शिस्तीचे व स्वच्छ-सुंदर शहरांचे जे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात साकारताना त्यांना हाताखालच्या अधिकाऱ्यांची फारशी साथ लाभली नाही. वर्षानुवर्षे पालिकेत ठिय्या दिलेल्या, घोटाळयांचे आरोप असलेल्या, अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव आणून त्यांची कोंडी केली. कचऱ्याची समस्या सोडवण्यात अपयश आल्याने उच्च न्यायालयाने लादलेल्या बांधकाम बंदीमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी रवींद्रन यांनाच लक्ष्य केले. गतवर्षी पाणी कपातीच्या काळात पाण्याचे नियोजन करताना रवींद्रन यांची कसोटी लागली. अनधिकृत बांधकामात गुंतलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा मुद्दा चांगलाच गाजला व आयुक्तांकरिता डोकेदुखी ठरला. यासंदर्भात शिवसेना नगरसेवकांवर झालेली कारवाई पाहता रवींद्रन हे भाजपाधार्जिणे असल्याची टीका त्यांना सहन करावी लागली. वाढलेला राजकीय हस्तक्षेप आणि दबाव यामुळे आयुक्तांच्या कारवाईला वेसण बसली. अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे यांच्या विरोधातील कारवाई हळूहळू शिथील होत गेली. पदभार स्वीकारताच ज्या तडफेने आयुक्तांनी घोषणा केल्या त्या हवेत विरल्या. आयुक्तांमधील आक्रमकता कुणीतरी काढून घेतल्यासारखे ते दिसू लागले.केवळ बैठका पण कृतीशून्यतेची टीका- शहरातल्या समस्या सुटणे दूर राहिले त्या उग्र बनल्या. सध्या इतरत्र ब्र न काढणारा विरोधीपक्ष मनसेकडून केडीएमसीत आक्रमक झाला. भाजपाचे सहयोगी अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी तर मुख्यालयाच्या समोर रवींद्रन यांच्या विरोधात उपोषण केले. त्यामुळे आधी धडाकेबाज बनलेले रवींद्रन भेटेनासे झाले. त्यांनी माध्यमांशी संपर्क तोडला. - स्वच्छ शहरांच्या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत शहरांचा क्रमांक झपाट्याने घसरला आणि २३४ व्या क्रमांकावर फेकला गेला. त्यावेळी आयुक्तांविरुद्ध चौफेर टीका सुरु झाली. प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन थातूरमातूर कारवाईपलीकडे रवींद्रन यांनी काहीच केले नाही. आयुक्त केवळ बैठका घेतात,आदेश देतात.कृती होत नाही, अशी चर्चा होऊ लागली.- मदान, चंद्रशेखर किंवा सिंह यांनी निदान शहरांवर छाप सोडली. हे अधिकारी अन्य शहरांत, मंत्रालयात गेले तेव्हा त्यांची कारकीर्द अधिक बहरली. मात्र रवींद्रन यांचा प्रवास धडाकेबाज ते निष्क्रिय असा उलट दिशेने झाला. त्याला त्यांच्याइतकेच पालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.