बदलापूर - नवदाम्पत्य हे मतदान करण्याचा हक्क बजावतानाचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे. मात्र बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात एका नवदाम्पत्याचे विवाह झाल्यावर मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दाम्पत्याची मांडवातुनच वरात मतदान केंद्रार्पयत काढण्यात आली. वाजत गाजत ही वरात मतदान केंद्रावर आल्यावर या दोघा नवदाम्पत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात राहणा-या वृषाली गाडे आणि शिवाजी पवार या एकाच गावात राहणा-या जोडप्याचा आज विवाह पार पडला. दुपारी हा विवाह सोहळा जाल्यावर या दोघा नवदाम्पत्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा होता. वरात ही नवरदेवाच्या घराकडे न काढता थेत नवरीच्या मांडवातुन थेट मतदान केंद्राकडे नेण्यात आली. यावेळी दोघांनीही गावातील मतदार केंद्रात आपल्या मतदानाचा हक्क बजावत पुन्हा वरातीत सहभागी झाले. वधू आणि वरांना मतदान केंद्राकडे आणन्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला होता. लग्नानंतर आधी मतदानाचा हक्क बजावणा-या या विवाह सोहळ्याची गावात चर्चा चांगलीच रंगली होती.
VIDEO : बदलापूरमध्ये लग्नाची वरात, मतदान केंद्राच्या दारात, वधु-वराने बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 4:07 PM