मुरबाड : यशवंतराव चव्हाणांपासून मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. मात्र गेल्या पाच वर्षांत राज्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी येथे केला. मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी प्रमोद हिंदूराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते.लोकशाहीला कीड लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची पिछेहाट झाली. मुरबाडच्या विकासालाही फटका बसला. तालुक्यास रोजगार मिळवून देणारी एमआयडीसी भकास झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मुरबाड एमआयडीसीला १0 कोटी रु पये देण्याची घोषणा केली. परंतु, ती घोषणा पूर्ण केली जाणार नाही.सरकारकडून केवळ फसवणूक केली जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात अनेकांनी आपले उखळ पांढरे केले. शेतकऱ्यांच्या जमिनी नगण्य किंमतीत घेऊन, त्या पाच पटीने विकल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या मिरवणुकीस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्तेही उपस्थित होते.
Vidhan sabha 2019 : अजित पवारांकडून सेनेची प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:51 AM