कल्याण, दि. 17 - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गेल्या 20 वर्षाच्या अर्थ संकल्पानुसार 2 हजार 497 कोटी रुपये खर्च विविध सेवा सुविधा पुरविण्यावर झाला आहे. प्रत्यक्षात नागरीकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे सेवा नाही तर कर ही नाही अशी भूमिका घेत जागरुक नागरिक एकवटले आहे. त्यांच्या वतीने येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी आंदोलन केले जाणार आहे. या सगळ्य़ा आंदोलनात माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणोकर यांनी पुढाकार घेतला आहे. घाणोकर यांनी महापालिकेने केलेल्या खर्चाची माहिती, माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. त्यांनी जागरुक नागरीकांना एकत्रित करण्यासाठी व्हॉटसअपवर आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जागरुक नागरीकांची काल एक बैठक पार पडली. या बैठकीला माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मनोज कुलकर्णी, सुलेख डोन, शैलेश जोशी, मुन्ना पांडे, योगेश दळवी, किशोर जैन, विकास करुडूसकर, माजी नगरसेवक इफ्तेखार खान, उमेश बोरगांवकर आदी उपस्थित होते. या नागरीक फोरमचे नाव अद्याप ठरविलेले नाही. लवकरच त्याचे नाव ठरविले जाईल. प्रशासनावर नागरीक सुविधा पुरविण्यासाठी एक दबाव तयार केला जाईल असे घाणोकर यांनी यावेळी सांगितले. डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. कल्याणमधील आधारवाडी कचरा डेपोचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. पाणी पुरवठय़ावर 60 कोटी रुपये खर्च झालेले आहे. तरी ही अनेक भागात पाण्याचा प्रश्न आहे. ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. पार्किगचा प्रश्न आणि विशेष करुन कोटय़ावधीचे बजेट असलेल्या महापालिकेला साधी सिग्नल यंत्रणा उभारता आलेली नाही. फेरीवाल्यांनी रस्ते
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ‘सेवा नाही, तर कर कशाला' या आंदोलनावर जागरुक नागरीक ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 7:34 PM