लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील रिक्षाचालक गणेश पवार यांच्या रिक्षात गांधीनगर येथून रिक्षात बसलेल्या एका महिलेची पर्स रिक्षात विसरली होती. ती त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने १ फेब्रुवारी रोजी प्राजक्ता जालनेकर (३०, रा. जोगेश्वरी, मुंबई) या महिलेकडे सुपूर्द केली. महत्वाची कागदपत्रे आणि काही रोकड असलेली ही पर्स सुखरुप मिळाल्यामुळे प्राजक्ता यांनी या रिक्षा चालकासह ठाणेपोलिसांचे आभार मानले आहेत.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथून ३१ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता या रिक्षामध्ये बसल्या. त्या गावदेवी मंदिर नौपाडा, बेडेकर हॉस्पीटल याठिकाणी उतरल्या. त्यांची पर्स मात्र त्या रिक्षातच विसरल्या होत्या. त्याबाबत त्यांनी ३१ जानेवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. दरम्यान, आपल्या रिक्षात महिला प्रवाशाची पर्स राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सतर्क आणि प्रामाणकि रिक्षा चालक पवार यांनी त्यांचे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार मित्र तानाजी पाटील यांना याची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी ही माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात दिली. उपनिरीक्षक तावरे यांच्या मदतीने पर्समधील कागदपत्रांच्या आधारे प्राजक्ता जालनेकर यांचा मोबाईल क्रमांक त्यांना मिळाला. त्यांनी त्यांना संपर्क करुन अखेर १ फेब्रुवारी रोजी महत्वाची कागदपत्रे आणि काही रोकड असलेली पर्स त्यांना सुपूर्द केली. आपली पर्स रिक्षाचालक आणि पोलिसांच्या मदतीने मिळाल्यामुळे प्राजक्ता यांनी समाधान व्यक्त केले. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनीही रिक्षाचालक पवार यांच्या प्रामाणकिपणाचे कौतुक केले.
सतर्क रिक्षा चालकामुळे रिक्षातील पर्स महिलेला सुखरुप परत मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 10:34 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील रिक्षाचालक गणेश पवार यांच्या रिक्षात गांधीनगर येथून रिक्षात बसलेल्या एका महिलेची पर्स रिक्षात ...
ठळक मुद्देरिक्षाचालक गणेश पवार यांचे पोलिसांनीही केले कौतुक