लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विक्रमगड येथील वनवासी विकास आश्रमच्या ज्ञानेश्वर मोरगा याने सलग दुसºया वर्षीही ‘आपण सारे’ आयोजित ‘रन फॉर चले जाव’ ही क्र ांती दौड जिंकली. पुरुष गटातील १० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती. ज्ञानेश्वरचाच सहकारी अजित माळी याला त्याने १ मिनिटाच्या फरकाने मागे टाकले. महिलांच्या १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत मुंबईच्या वर्षा भवानी हिने पहिला क्र मांक पटकावला.पुरुष गटात उरण जिमखान्याच्या सुजित गमरे याने तिसरा क्र मांक मिळवला. महिलांच्या गटात वर्षाने ठाण्याच्या माधुरी देशमुख हिला पाठीमागे सोडत ही स्पर्धा जिंकली. ठाण्याच्या गीता राठोड हिने तिसरा क्र मांक मिळवला. या स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व उपनगरे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील जवळपास हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेची सुरुवात खेवरा सर्क ल येथून झाली. या वेळी पॅरा आॅलिम्पिकमधील दुहेरी सुवर्णपदक विजेता आणि नुकताच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पद्मश्री किताब विजेते देवेंद्र झझारिया यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यातआला.तसेच विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पे, सुमन अगरवाल, सचिव संजय चौपाने, के. वृषाली, आपण सारेचे प्रमुख बाळकृष्ण पूर्णेकर, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक पुनीतकुमार, कर्नल (निवृत्त) सुनील माने, ठाणे परिवहन मंडळाचे सदस्य सचिन शिंदे यांनीही विजेत्यांना सन्मानित केले.१८ वर्षांखालील मुलांच्या गटातील रोहिदास मोरगा (पालघर), रोहित मांडवकर (ठाणे), मुकेश बिंद (ठाणे),मुलींमध्ये प्रतीक्षा कुलये (मुंबई), हर्षाली भोसले (ठाणे), दर्शना दांगटे (मुंबई) यांनी तर १५ वर्षांखालील मुलांमध्ये निहार गायकवाड ( मो.ह.विद्यालय), रिषीराज धरणे (मो.ह.विद्यालय), यश शिंदे (लोकपुरम पब्लिक स्कूल)तर मुलींमध्ये दीक्षा सोनसुरकर (अॅचिव्हर्स स्पोर्ट्स क्लब), अदिती पाटील (लोकसिटी ट्रस्ट), कृणाली पवार (रायझिंग स्टार) यांनी बक्षिसे मिळवली.१२ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात सोहम पाटील (लोकपुरम सिटी ट्रस्ट), क्रि श यादव (श्री माँ निकेतन), सोहम मिंडे (सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स क्लब) तर मुलींच्या गटात परिणा खिल्लारी (आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूल), रेवा डिसा (रायझिंग स्टार्स), संजना सावंत ( ट्रॅक अॅण्ड फिल्ड) यांनी विजय मिळवला.
ठाण्यातील क्रांती दौड ‘विक्रमगड’ने जिंकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:27 AM