उचले गाव देशमुखपाडा येथील निकृष्ट दर्जाच्या पाणीपुरवठा योजनेविरोधात शिवसेनेने आमरण उपोषण सुरू झाले आहेत. शिवसेना तालुका संघटक गुरुनाथ भुंगेरे पाटील व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाचे कारण सन 2018/19मध्ये उचले देशमुखपाडा गावातील पाणीपुरवठा योजना ही निकृष्ट दर्जाची करण्यात आली होती. याची तक्रार 12 मार्च 2020ला करण्यात आली होती, मात्र याची ही गंभीर बाब लक्षात घेतली नसल्याने आज शुक्रवारपासून आमरण उपोषणाला गावातील नागरिक उचले देशमुखपाडा येथील पाण्याच्या टाकीवर बसले आहेत.चासोळे येथील काळू नदीपूर टोकावडे गावाशी संपर्क तुटलाचासोळे नदीला पूर आल्याने नागरिकांचा टोकावडे बाजारपेठचा संपर्क तुटला आहे, ह्या पुलाला कठडे नसल्याने वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या 30 वर्षांपासून हा काळूचा पूल आहे, येथील शाळकरी मुलांना पण या पुलावरून प्रवास करा लागत आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना टोकावडे मुरबाड कल्याण मुंबई येथे दररोज कामानिमित्त जावे लागते. या गावावरून पुढे आंबिवली, जडई, खुटल, वाकळवाडी, न्याहाडी हे गाव आहे. तरी या पुलाचा बंदोबस्त लवकरच करावा अशी मागणी गावकरी विश्वास राऊत यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे 1 कोटी योजनेतील कोटीचे काही भाग वाहून गेले आहेत.
उचले ग्रामस्थांनी केले बेमुदत उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:39 PM