डोंबिवली : ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवावे लागते, ही देशातील नागरिकांची शोकांतिका असून प्रत्येक नागरिकाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सध्या या अभियानाच्या नावाखाली अनेक ठिकाणी केवळ फोटोसेशन केले जाते. प्रत्यक्षात अस्वच्छता तशीच राहते. हे देखावे करून आपण कोणाला फसवत आहोत, असा सवाल मणिपूरच्या (इम्फाळ) विनय साहू याने केला. ‘स्वच्छता राखा’, असा संदेश देत साहू सायकलने देशभ्रमंती करतोय.२००० मध्ये दुचाकीच्या अपघातात त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे डावा हात काम करेनासा झाला. पण, तरीही आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर त्याने सायकलभ्रमंती करत देशवासीयांना संदेश देण्याचा चंग बांधला. तो रविवारी डोंबिवलीत आला होता. साहूने १ मार्चला बंगळुरू येथून सायकलवरून देशभ्रमंती सुरू केली. त्या दौऱ्यात बंगळुरू, हैदराबाद, जहिराबाद, उमरगंज, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, पुणे, लोणावळा, पनवेल आणि डोंबिवली असा त्याचा प्रवास झाला. आता पुढे तो सुरत, राजस्थान, दिल्ली, काश्मीर असा प्रवास करणार आहे. या दौऱ्यात जेथे रात्र होते, तेथे तो वास्तव्य करतो. दौऱ्यातील अनुभवाबद्दल साहू म्हणाला की, काही जणांनी त्याच्या उपक्रमाची खिल्ली उडवली, तर बहुतांश लोकांनी त्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. विनय जेथे थांबतो, तेथे स्वच्छतेचा संदेश देतो. अनेक ठिकाणी स्वत: सफाई करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो.महाराष्ट्रात त्याला योगदान फाउंडेशनने साहाय्य केले. विनयला पुणे-लोणावळा, पनवेल आणि डोंबिवलीत वास्तव्यासाठी आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या संस्थेने सहकार्य केले. त्याच्या या जिद्दीला सलाम करत एका पुणेकराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ५० हजारांची सायकल भेट दिल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.दिवसात ६ ते ८ तास सायकल चालवायची. प्रवासात जेवणाऐवजी लिंबूपाणी किंवा तत्सम पेय घेतल्याने अधिक काळ सायकल चालवणे सोपे जाते, असे तो सांगतो. त्याच्यासोबत तंबू, स्लिपिंग बॅग, सायकल ठेवण्यासाठी आवश्यक ते सामान आणि भारताचा तिरंगा एवढेच सामानसुमान आहे. * पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची त्याची इच्छा आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवून त्यांनी देशातील बकालीकडे लक्ष वेधले. राजस्थानच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घडवून देण्याचा शब्द दिला असल्याचे साहू सांगतो.* सिव्हील क्षेत्रात काम करत होतो, त्यानंतर शारीरिक आपत्ती आल्याने ते काम थांबले. लग्न झाले असून पत्नीसह दोन मुले व अन्य परिवार सध्या बंगळुरू येथे वास्तव्याला आहे. घरून फारसे प्रोत्साहन मिळत नाही, पण या उपक्रमाला ना देखील नाही, असे विनय म्हणाला. * -----------फोटो : २० डोंबिवली विनय सायकलअनिकेत घमंडी
विनय साहूचा स्वच्छता संदेश
By admin | Published: March 21, 2016 1:29 AM