कमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी एकाच दिवसात ४०९ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ३४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हयात संचादबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ठाणे ग्रामीण भागातील मीरा रोड, भार्इंदर, गणेशपूरी, शहापूर आणि मुरबाड या पाचही उपविभांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळया ठिकाणी २८ एप्रिल रोजी विनाकारण रस्त्यावर फिरणा-या ४०९ चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली. त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे. दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी एकाच दिवसात ११२ आरोपींविरुद्ध ११ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडूनही स्थानिक पोलिसांनी सहा वाहने जप्त केली.दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलिसांनी २४ ते २६ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये १५०७ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पाच लाख दहा हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच काळात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३६७ आरोपींविरुद्ध ५५ गुन्हे नोंदविले. त्यांच्याकडूनही स्थानिक पोलिसांनी २३ वाहने जप्त केली.याशिवाय, कोरोनाच्या संदर्भातील अफवा पसरविणाºया सहा जणांविरुद्ध नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये, संचारबंदीचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवसांत केली ४०९ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:17 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर सुरु असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणाऱ्या ४०९ वाहन चालकांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवसात कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ३४ हजार ७०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
ठळक मुद्देएक लाख ३४ हजारांचा दंड वसूल११२ आरोपींवर कारवाई