शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कल्याण डोंबिवलीत पशुगणनेमुळे प्लास्टिक बंदी आदेश धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 7:43 PM

महापालिकेकडून होतोय काणाडोळा; निवडणुकीच्या कामांमुळेही कारवाई होणार अशक्य

- अनिकेत घमंडीडोंबिवली: राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतांनाच कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत. भाजीबाजारात, फेरीवाल्यांकडे अन्यत्र छोट्या व्यावसायिकांकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत. ही बंदी लागू झाल्यानंतर सर्वत्र कारवाईचा सपाटा लावणा-या कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने पशूगणनेसह निवडणूक कामांमध्ये कर्मचारी व्यस्त असल्याचे कारण देत या कारवाईकडे परस्पर काणाडोळा केला आहे.त्याचा फायदा घेत डोंबिवलीमध्ये फडके रोड, चिमणी गल्ली, रेल्वे स्थानक परिसर तसेच रामनगर, पश्चिमेला उमेशनगर, गुप्ते रोड या ठिकाणी तसेच कल्याणमध्येही पूर्व पश्चिम भागातील फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते यांच्याकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत. या सर्व ठिकाणी प्लास्टिक बंदीची कडक कारवाई करण्यासाठी कर्मचारी वर्गाकडे वेळ नसल्याने या अतिरिक्त दिलेल्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.एकीकडे या महापालिकेत कच-याची समस्या गंभीर असतांनाच प्लास्टिक बंदीमुळे सुमारे ४० टन कचरा कमी झाल्याची स्पष्टोक्ती अधिका-यांनी दिली होती. त्यातच ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठीही स्वच्छता विभागाकडून प्रचंड प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध ठिकाणच्या सोसायट्यांना वेगवेगळया रंगांचे डबे दिले जात आहेत. पण त्याचा प्रसारही थंडावला असल्याने ती समस्या देखिल जैसे थे आहे. अद्यापही बहुतांशी सोसायट्या सगळा कचरा एकत्रच देत असून महापालिकेच्या आरसी गाड्या, घंटागाड्यांमध्ये तो गोळा केला जात आहे. त्यात सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत असून महापालिकेने राज्य शासनाचे आदेश धाब्यावर बसवल्याची सर्वत्र चर्चा आहे.सत्ताधारी शिवसेना भाजपालाही पर्यावरणाचा -हास होत असल्याबद्दल कोणतेही गांभिर्य नाही, त्यामुळेच एकीकडे या पक्षांचे नगरसेवक ओला सुका कचरा वर्गीकरणासाठी आग्रही असले तरीही परिसरात प्लास्टिक बंदीच्या पिशव्या मिळू नयेत, त्यावर कारवाई व्हावी यासाठी मात्र धडपड करतांना आढळून येत नसल्याची टिका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.माझे सफाई निरीक्षक असे सुमारे ६० अधिकारी पशुगणनेच्या कामामध्ये व्यस्त आहेत. त्यातच आता निवडणूकांचीही कामे लागणार आहेत. पशुगणना व अन्य कामांमुळे प्लास्टिक बंदीवरील कारवाई कमी झाली असली तरी आता पुन्हा त्यावर जोर देण्यात येणार असून नक्की फरक जाणवेल - विलास जोशी, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी शहरांमध्ये सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत हे खर आहे. त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश सफाई अधिकारी वर्गाला तातडीने दिले आहेत - विनिता राणे, महापौर, केडीमएसीप्लास्टिक बंदी ही सोयीनुसार सुरू आहे. बंदीची कारवाई हा केवळ फार्स. त्या नावाखाली कोणाचे चांगभल होत आहे हे जाणण्याची खरी गरज आहे.पण त्यामुळे शहर बकाल होत आहेत याकडे मात्र सत्ताधा-यांचेही लक्ष नाही ही शोकांतिका आहे - प्रकाश भोईर, विरोधी पक्षनेते, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी