शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घ्या खबरदारी! कोरोनाबाबत नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 5:26 PM

Corona Rules Violation : उल्हासनगर महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी - आयुक्त दयानिधी

ठळक मुद्देदेशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना उल्हासनगर महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी झाल्याचा दावा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी केला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले असून मास्क न वापरणाऱ्यावर पहिली दोन व दुसरीवेळ दंडात्मक कारवाई तर तिसऱ्यांदा थेट एफआरआय दाखल करण्याचे संकेत आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी दिले. तसेच प्रसिद्धपत्रक काढून नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान महापौर, उपमहापौर, अतिरिक्त आयुक्त यांनीही पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना उल्हासनगर महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी झाल्याचा दावा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी केला. त्यांनी मंगळवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेवर, येथील पत्रकारांनी बहिष्कार टाकल्याने, त्यांनी प्रसिद्धपत्रक काढून नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. गेल्या दोन दिवसात १३ व १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून शांतीनगर येथील २०० बेडच्या साई प्लॅटिनियम रुग्णालयाला कोविड रुग्णालय घोषित केले. रुग्णालयात तब्बल ६९ बेड आयसीयू आहेत. महापालिकेने घातलेल्या नियमाचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन आयुक्तांनी करून मास्क व सोशल डिस्टन्स न ठेवल्यास प्रथम २००, दुसरी वेळ ५०० तर तिसरी वेळ थेट एफआरआय कारवाईचे आदेश दिले.शहरातील दुकाना समोर फक्त ५ ग्राहक उभे राहतील याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम २ हजार, दुसरीवेळ ५ हजार तर तिसरी वेळ थेट एफआरआय अथवा दुकान कायम बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. लग्नाचे हॉल, लॉन्स, बंदिस्त सभागृह व खुले मैदान यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम २० हजार दंडात्मक कारवाई तर दुसरी वेळ सीलबंदीची कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २ हजार दंड अथवा गुन्हा दाखल करण्याचा बडगा आयुक्तांनी उगारला आहे. लग्न व इतर सभारंभास जास्तीत जास्त ५० तर अंत्यविधीसाठी २० नागरिकांची मर्यादा घालून देण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व तंबाखू सेवनास बंदी घालण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान मंगळवारी महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर व शिवसेना शहरप्रमुख यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन कोरोना काळात नियमांची माहिती देऊन नियम पाळण्याचे आवाहन केले.महापालिका लॅबमध्ये २४ तास कोरोना चाचण्यामहापालिकेने गेल्या दोन महिन्यांपूर्वी अत्याधुनिक लॅबचे उदघाटन करून कोरोनासह इतर चाचण्या करण्यात येईल. असे आश्वासन आयुक्तांनी उद्घाटनाच्यावेळी दिले होते. आज २४ तास कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती महापालिका वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली. तसेच कोविड रुग्णालय साई प्लॅटिनियमसह आयटीआय, तहसील, रेड क्रॉस येथील आरोग्य केंद्र सज्ज असल्याची माहिती देऊन टाटा आमंत्रण सज्ज असल्याचे सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरcommissionerआयुक्त