शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संचारबंदीचे उल्लंघन: १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: March 31, 2020 9:06 PM

गेल्या आठवडाभरामध्येसंचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची वाहतूक करणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हेविलगीकरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुद्धही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवडाभरामध्ये कारवाई केली आहे. नागरिकांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील तसेच पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक हे अचानक भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. २२ मार्च ते २९ मार्च या आठ दिवसांमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाºया १७७ जणांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई केली आहे. वेगळे राहण्याचे आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणाºया एकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाहेर जाणाºया १०० मजूरांना कल्याण तालुका तर ४८ मजूरांना कसारा पोलिसांनी या काळात पकडले. त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठविण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणाºया १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.आतापर्यंत ४४५ व्यक्तींना ठेवले विलगीकरणातठाणे ग्रामीण भागातील ४४५ व्यक्तींना गेल्या आठवडाभरामध्ये वेगळे (क्वारंटायर) राहण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये काशीमीरा भागात सर्वाधिक म्हणजे १४६ त्यापाठोपाठ नवघरमध्ये ११५ तर मीरा रोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ९२ जणांना विलगीकरणामध्ये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस