शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

By admin | Published: March 07, 2016 2:13 AM

जनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा

शशी करपे,  वसईजनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा. सत्ता मिळविणे, निवडून येणे हे आपले उद्दीष्ट नाही. लोकांच्या हितासाठी लढत राहिले पाहिजे. त्यासाठी श्रमजीवीच्या फौजेसह आपल्यासोबत कायम राहिन. आव्हान मोठे आहे. पण, संघर्ष केल्यास वसईत २००९ ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार आणि जनआंदोलन समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शनिवारी रात्री वसई गिरीज येथे झालेल्या जनआंदोलनाच्या सभेत बोलताना व्य्नत केला.गावाचा प्रश्न तापल्यानंतर वसईत राजकीय धु्रवीकरण होऊन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जनआंदोलनाच्या बॅनरखाली पंडितांनी विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी २१ नगरसेवक निवडून आणले होते. इतकेच नाही तर ठाणे जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा मिळवत वसई पंचायत समितीवरही सत्ता मिळवली होती. त्यामुळे वसईत ठाकूरांपुढे मोठे आव्हान तयार झाले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने ते वसईतून दूर गेले होते. पालिका , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते दूर राहिल्याने जनआंदोलनाची पिछेहाट होऊन जनआंदोलन समिती एकाकी पडली होती.वसईपासून दुरावलेल्या पंडितांनी वसई वगळता पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामधील श्रमजीवीच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने सुरु केली. तसेच नुकत्याच झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचारात भाग घेतला होता. आता वसई आणि जनआंदोलनापासून दूर असलेले पंडित अचानक जनआंदोलनाच्या व्यासपीठावर हजर झाले. ५ मार्च २०१० रोजी पोलिसांनी वाघोली येथे लोकांवर केलेल्या अत्याचाराला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पंडित म्हणाले की, वसईत दिसत नसलो तरी वसईतील राजकारण सोडलेले नाही.पालघर विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात माझाही वाटा आहे. वसईतही त्यांना रोखणे अवघड नाही. वसईत २००९ ची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी चर्चा करीत न बसता अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून नव्या पिढीला सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे. नुसत्या चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. मी स्वत: श्रमजीवीला सोबत घेऊन ताकदीनिशी जनआंदोलनाच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होईन, असे सांगितले. पंडित अद्यापही शिवसेनेचे उपनेते असून जनआंदोलन समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे पंडित पुन्हा एकदा वसईच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.