शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

मतदारयाद्यांमधील घोळाने पक्ष, मतदार संभ्रमात

By admin | Published: February 21, 2017 6:01 AM

मतदारयाद्यांमधील अनुक्रमांक बदलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतदारांना यादीतील आपले नाव शोधणे

ठाणे : मतदारयाद्यांमधील अनुक्रमांक बदलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतदारांना यादीतील आपले नाव शोधणे अवघड झाले आहे. परंतु, यावर उतारा म्हणून पालिकेने एक स्वतंत्र सर्च इंजीन सुरू केले आहे. असे असले तरी अनेकांची नावे या इंजीनमध्ये सापडेनाशी झाली आहेत. याद्यांमधील घोळ अद्यापही संपुष्टात आला नसून पालिकेच्या निवडणूक विभागाने रविवारी तिसऱ्यांदा नव्याने यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु, आता या यादीची फोड कशी करायची आणि मतदारांपर्यंत त्यांच्या स्लीप कशा पोहोचवायच्या, असा प्रश्न सध्या सगळ्याच पक्षांना सतावू लागला आहे. त्यात यापूर्वी विविध पक्षांमार्फत घरोघरी वाटण्यात आलेल्या स्लीपमध्येदेखील घोळ असून मतदान केंद्र नेमके कोणते, याचे उत्तर मात्र मतदाराला सापडू शकलेले नाही.महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आजही निवडणुकीच्या कामात घोळ सुरू आहेत. त्यात आता आणखी एक घोळ समोर आला आहे. मतदारयाद्या बनवताना आणि त्यांची प्रभागांनुसार फोड करताना काही चुका झाल्यामुळे त्या सुधारताना निवडणूक विभागाची मोठी डोकेदुखी झाली आहे. आजही अशा तक्रारी घेऊन अनेक जण ठाणे महापालिकेत घिरट्या घालत आहेत. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागातील मतदार भलत्याच प्रभागात आढळून आल्याने उमेदवार चिंतेत आहेत. तक्र ार करूनही त्यात सुधारणा झाली नसल्याने काही उमेदवारांनी हक्काचे मतदार गमावले आहेत. विकत घेतलेल्या मतदारयाद्यांनुसार मतदारांची ओळखपरेड सुरू केली असताना त्यांना त्यांचे मतदार केंद्र आणि मतदार क्र मांक समजावून सांगितले जात असताना पुन्हा नव्याने केंद्र क्र मांक आणि मतदार क्र मांक सांगावा लागणार आहे. आधीच चार प्रभागांत फिरताना उमेदवारांची दमछाक होत असताना निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांमुळे उमेदवार टेन्शनमध्ये आले आहेत. आता महापालिकेने पुन्हा तिसऱ्यांदा रविवारी मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु, त्या फोडायच्या केव्हा आणि त्यातील स्लीप मतदारापर्यंत वाटायच्या केव्हा, असा पेच पक्षांना सतावू लागला आहे. त्यातही यापूर्वीच भाजपा वगळता बहुतेक सर्वच पक्षांनी मतदारांना स्लीप घरपोच केल्या आहेत. यामध्येही घोळ असल्याची बाब समोर येत आहे. काहींमध्ये अमुक एक शाळा, तर काहींमध्ये दुसरीच शाळा आणि आता तिसऱ्यांदा प्रसिद्ध झालेल्या यादीत आणखी नवे मतदान केंद्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मतदातादेखील गोंधळला असून नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करायला जायचे आहे. निवडणूक विभागाकडून झालेल्या या गोंधळामुळे मतदारराजाला कदाचित मतदानाच्या दिवशी दोन ते तीन ठिकाणी रांगा लावाव्या लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, नव्याने प्रसिद्ध झालेल्या याद्या आणि मतदान केंद्रनिहाय याद्यांमधले अनुक्र मांक वेगवेगळे आहेत. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता गृहीत धरून नव्या यादीसोबत जुन्या यादीतलेही अनुक्र मांक देऊन गोंधळ कमी करता येईल का, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम आॅनलाइन करणे अवघड असल्याने मनुष्यबळाचा वापर करून ते करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.(प्रतिनिधी)मतदारांच्या घरी स्लिप पोहोचल्या नाहीतमुंब्रा : मतदारांना त्यांचे मतदान कुठे आहे, याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या स्लिप मतदारांपर्यंत पोहोचवण्यात काही प्रभागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर अनुत्सुकता दाखवल्याने अनेक मतदार आपले मतदान नेमके कुठे आहे, याबाबत संभ्रमास्थेत आहेत. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मतदानाच्या स्लिपवर मतदारांचे नाव, मतदारयादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राचे ठिकाण, आदींचा उल्लेख असतो. त्यामुळे मतदारांची मतदान केंद्र शोधण्याची होणारी धावपळ वाचते. परंतु, या वेळी कार्यकर्त्यांनी स्लिप धाडण्याकडे दुर्लक्ष केल्याची सार्वत्रिक भावना आहे.