वाडा : एमएमआरडीएच्या क्षेत्रात वाडा तालुक्याच्या समावेशासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यातून भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या धर्तीवर वाडा तालुक्यातही सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते उभारण्याबरोबरच विकासकामे होतील, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनी दिले.भाजप, शिवसेना, श्रमजीवी संघटना, रिपाइं (आठवले गट), कुणबी सेना यांच्या महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा तालुक्यात शुक्रवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पाटील यांनी विविध गावांमध्ये नागरिकांशी संवादही साधला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी काठोळे आदी उपस्थित होते.दौऱ्याला गणेशपूरी येथील नित्यानंद बाबांच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रारंभ करण्यात आला. मंदिराबाहेरील विक्रेत्यांबरोबर संवाद साधला. त्यानंतर निंबवली, गोराड, केळठण, डाकीवली, कुडूस, नेहरोली, गांध्रे आणि पाली येथे ते पोचली. पाटील यांनी काही गावांमध्ये थेट ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी काळातील योजनांची माहिती दिली. वाडा बस स्थानकामध्ये जाऊन त्यांनी प्रवाशांशी सवांद साधुन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.एसटीतील प्रवाशांशी संवादवाडा तालुक्यात एस. टी. हे प्रवासाचे मुख्य साधन आहे. या पार्श्वभूमीवर एस. टी. ने प्रवास करणाºया प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी वाडा एस. टी. स्टॅण्डला भेट दिली. तसेच एका बसमधील प्रवाशांशी संवाद साधून प्रवास केला. आगामी काळात वाडा तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच कल्याण व ठाण्याकडे जाणारी चांगली सेवा उपलब्ध करु न देण्याचे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले.
वाडा एमएमआरडीमध्ये समाविष्ट करू - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:10 PM