शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

मागास निधीसह प्रभाग सुधारणा निधीला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 6:29 AM

मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेने मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधीसह मागासवर्गीय निधीला सपशेल कात्री लावली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी जरी दिला असला तरी तो तुटपुंजा आहे. त्यामुळे आता तीन दिवस चालणाऱ्या अंदाजपत्रकावरील चर्चेत पुन्हा ठराव होऊन त्यासाठी नगरसेवकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

ठाणे - मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेने मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधीसह मागासवर्गीय निधीला सपशेल कात्री लावली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी जरी दिला असला तरी तो तुटपुंजा आहे. त्यामुळे आता तीन दिवस चालणाऱ्या अंदाजपत्रकावरील चर्चेत पुन्हा ठराव होऊन त्यासाठी नगरसेवकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाप्रमाणे मागील वर्षीदेखील नगरसेवक निधीसह इतर निधीसाठी तरतूदच केली नसल्याची बाब सोमवारच्या अर्थसंकल्पीय विशेष महासभेत नगरसेविका साधना जोशी यांनी निदर्शनास आणली. ही बाब अतिशय गंभीर असून केवळ नगरसेवकच नाही, तर महापौरांनी सुचवलेल्या कामांच्या बाबीतील निधीचादेखील यात उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नगरसेवक निधी, मागासवर्गीय निधीसाठी तरतूद करावी.तसेच मागील वर्षी महापौरांनी सुचवलेल्या कामांसाठी ११ कोटींची तरतूद महासभेने प्रस्तावित केली होती. यंदा त्यात वाढ करून ती १५ कोटींची करावी, अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे प्रभाग सुधारणा निधीदेखील केवळ ११ कोटीच दिला असून तो अतिशय तुटपुंजा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी या मुद्याला हात घातल्याने आता तीन दिवस चालणाºया या महासभेत मागासवर्गीय निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून प्रभाग सुधारणा निधीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खर्च झालेला नगरसेवक निधी...२०१२-१३ साली २७ कोटी २४ लाखांच्या नगरसेवक निधीपैकी २० कोटी ५६ लाख रु पये खर्च झाले होते. २०१३-१४ साली ३५ कोटी ८३ लाखांपैकी २३ कोटी ३८ लाख, २०१४-१५ मध्ये ४२ कोटी ८० लाखांपैकी २४ कोटी ६१ लाख, तर मागील वर्षी ४८ कोटींपैकी २९ कोटी ६८ लाख खर्च झाले होते. मागील चार वर्षांतला जवळपास २१ कोटी रु पयांचा शिल्लक निधी आणि यंदाचे जवळपास ३० कोटी असा ५१ कोटी ६१ लाखांचा नगरसेवक निधी २०१६ मध्ये उपलब्ध झाला. त्यानुसार, त्याचे प्रगती पुस्तक तयार करण्याचे पालिकेने निश्चित केले. परंतु, त्याचे काय झाले, याचे उत्तर मात्र सध्या तरी प्रशासनाकडे नाही. एकूणच या पुस्तकाबद्दल साशंकता आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका