------------
आज लसीकरण नाही
कल्याण : राज्य सरकारकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे शनिवारी कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्व लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.
----------------
‘बसथांब्यावर बाकडी टाका’
डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा बसथांब्यावर बाकडी नाहीत. त्यामुळे तेथे बस पकडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या बसथांब्यावरून प्रवासी मोठ्या प्रमाणात बस पकडतात. त्यामुळे तेथे तत्काळ बाकडी टाकून त्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक डॉ. आनंद हर्डीकर यांनी केडीएमसीकडे केली आहे.
--------------
कोरोनाचे नवे ८७ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे नवे ८७ रुग्ण आढळून आले. ९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या एक हजार २०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३८ हजार ६७ रुग्ण आढळून आले आहेत. एक लाख ३४ हजार २३० इतके रुग्ण बरे झाले आहेत.
---------------
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण
डोंबिवली : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाकुर्ली पूर्वेतील हनुमान मंदिरालगतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून येजा करताना वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर गुरुवारी खडी आणि रेती टाकून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण पावसात खडी आणि रेती वाहून गेल्याने पुन्हा खड्डेमय स्थिती निर्माण झाली आहे.
---------------