- राजू काळेभार्इंदर : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सागरी पोलीस ठाण्याची नवीन वास्तू गेल्या सहा महिन्यांपासून बांधून पूर्ण असली, तरी तिच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या बांधून पूर्ण झालेल्या पण वापर होत नसलेल्या पोलीस ठाण्याच्या भाड्यापोटी ठाणे ग्रामीण पोलीस दरमहा ११ हजार रुपये मोजत आहेत.शहरात १९९२ पूर्वी काशिमीरा व भार्इंदर ही दोनच पोलीस ठाणी होती. १९९२ नंतर मीरा रोड येथील कनाकिया परिसरात नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. तद्नंतर भार्इंदर पूर्वेस नवघर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. ही पोलीस ठाणी सरकारी जागेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मीरा-भार्इंदर शहर मुंबईला लागून असल्याने शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्याप्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. २०१३ मध्ये उत्तनच्या आनंदनगर येथे नवीन उत्तन सागरी पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. हे पोलीस ठाणे सध्या भाडेतत्त्वावरील वास्तूत सुरू असून त्यात पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहराच्यापश्चिमेस सुमारे ८ ते १० किलोमीटरचा सागरी किनारा असल्याने त्याच्या सुरक्षेसह तेथील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने नवे पोलीस ठाणे उभारण्याचे ठरले. २०१५ मध्ये नयानगर पोलीस ठाणेसुद्धा एका अपुºया जागेत सुरू करण्यात आले. या दोन्ही पोलीस ठाण्यांत लॉकअपसह अनेक गैरसोयी असल्याने महिला कर्मचाºयांची मोठी कुचंबणा होत आहे.दरम्यान, शहरात पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध न झाल्याने अखेर ते वसई येथे सुरू केले जाणार असल्याचे राज्य सरकारकडून अलीकडेच जाहीर करण्यात आले. या आयुक्तालयाच्या कक्षेत शहराचा समावेश होणार असला, तरी या सहा पोलीस ठाण्यांत आजही अत्यल्प मनुष्यबळ तैनात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत एक हजार नागरिकांमागे किमान एक पोलीस कर्मचारी असणे अपेक्षित आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांहून अधिक असली व जनगणनेनुसार ती सुमारे आठ लाख १४ हजार इतकीच असली, तरी या सहा पोलीस ठाण्यांत लोकसंख्येच्या प्रमाणात ८०० हून अधिक पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या एकूण ५०८ कर्मचारीच तैनात आहेत. त्यात सुमारे ३० ते ३५ अधिकाºयांचा समावेश आहे. शहरात पोलीस ठाणी वाढली पण मनुष्यबळ तुटपुंजेच राहिले. अशातच २०१५ पासून अधिकाºयांनी गृह विभागाकडे पाठपुरावा करून उत्तन सागरी पोलीस ठाण्याला उत्तन-गोराई मार्गावरील सर्व्हे क्रमांक २०१ (अ) ही सुमारे एक एकर सरकारी जमीन उपलब्ध करून दिली. त्यावर सहा महिन्यांपूर्वीच सागरी पोलीस ठाण्याच्या एकमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून हे पोलीस ठाणे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकारी आहेत. पण, मुख्यमंत्र्यांची वेळच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सहा महिन्यांपासून धूळखात पडलेल्या या पोलीस ठाणाच्या जागेच्या भाड्यापोटी ठाणे ग्रामीण पोलिसांना दरमहा ११ हजार रुपये भाडे राज्य सरकारला अदा करावे लागत आहे.याबाबत मला काहीच माहिती नाही. अधिक माहिती घेतो.- अतुल कुळकर्णी, सहायक पोलीस अधीक्षक
पोलीस ठाण्याला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा, सहा महिन्यांपासून खोळंबले उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:19 AM