सुरेश लोखंडे
ठाणे : जनजीवन विस्कळीत करणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील घरांसह भाजीपाला, वीजपुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, रहिवाशांना एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांच्या भरपाईसाठी शासनाच्या निकषांनुसार पंचनामे करण्यात आले. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याचे संकेत असून, ही भरपाई दोन कोटी रुपयांपर्यंत मिळेल, अशी नागरिकांना आशा आहे.
चक्रीवादळाचा फटका अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याला जास्त बसला. या वादळामुळे १६२ घरांचे अंशत: नुकसान, तर ३0७ झाडे, १५0 विजेचे खांब पडले. कल्याणला तीन बकºया विजेच्या धक्कयाने मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी भरपाई देण्याचे आदेशही जारी केले. १३ मे २0१५ रोजीच्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करून तब्बल एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांचा भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याच्या चर्चेमुळे नुकसानग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत ठाणे परिसरातील सर्वाधिक एक कोटी चार लाख ३५ हजारांवरच्या नुकसानभरपाईचा अहवाल दिला आहे. यामध्ये सर्वाधिक एक कोटी तीन लाख ७0 हजार वीजपुरवठ्यासंबंधीच्या नुकसानीचा समावेश आहे. घरांचे नुकसान ६0 हजारांचे, तर शाळांच्या पाच हजारांच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यासाठी ३५ लाख ७५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे.अंबरनाथ तालुक्यातील फळबागा, घरांचे नुकसानच्जिल्ह्यात तृतीय क्रमांकाचे १६ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान अंबरनाथ तालुक्यात झाले आहे. यात कोरडवाहू शेतीचे १४ हजार ७00 रुपये, बागायतीचे तीन लाख २२ हजारांचे आणि १६ हजारांच्या फळबागांचा समावेश आहे. याशिवाय, घरांचे सव्वाचार लाखांचे नुकसान झाले असून, शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख ६६ हजार आणि आरोग्य केंद्रांच्या अवघ्या एका लाखाच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.च्भिवंडी तालुक्यात १0 लाख ४९ हजारांचे नुकसान झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख २२ हजारांचे, आरोग्य केंद्रांचे सव्वादोन लाखांचे व घरांचे एक लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. शहापूरला सात लाखांच्या भरपाईचे पंचनामे निश्चित केले आहेत. यापैकी घरांचे चार लाख ३७ हजारांचे, तर ग्रामपंचायती, शाळासंबंधी दोन लाख ६३ हजारांच्या भरपाईचा समावेश आहे.च्कल्याण तालुक्यामधील सहा लाख ४७ हजारांच्या भरपाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. यापैकी घरांचे एक लाख ६७ हजारांचे, शाळा, ग्रामपंचायतीशी संबंधित चार लाख ८० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. उल्हासनगरला एक हजार लाख आठ हजारांच्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.शासन निकषांनुसार नुकसान व भरपाईची रक्कमवीज यंत्रणा - १0,३७0,000/-शाळा / ग्रा.पं. - ४,४४,१000/-प्राथमिक आरोग्य केंद्र - ५,८0,000/-घरे - २४,१५,९00/-अंबरनाथमधील शेती - ३,५२,९00/-