शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

‘वालधुनी’चे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट; आरोग्य विभागाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:02 AM

मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

कल्याण : मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण थांबणार कधी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.सह्याद्रीच्या खोऱ्यातील मलंग गडाच्या डोंगरातून वालधुनी नदी उगम पावते. ती अंबरनाथ ते कल्याण खाडीदरम्यान ३१ किलोमीटर लांब वाहते. नदीच्या तिरावर १० व्या शतकात बांधलेले अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर आहे. १९२३ मध्ये काकोळे येथे ब्रिटिशांनी जीआयपी टँक बांधला. त्याची क्षमता सहा दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची आहे. या टँकमधून कल्याण रेल्वेस्थानकाला पाणीपुरवठा होत असत. परंतु, वाढत्या नागरीकरणामुळे वालधुनी नदीची गटारगंगा झाली आहे. ही नदी उगमापासूनच प्रदूषित असल्याचा अहवाल उल्हासनगरातील चांदीबाई महाविद्यालयाने केलेल्या ‘सेव्ह गुड अर्थ’ या प्रकल्पाद्वारे दिला होता. केंद्रीय प्रदूषण अहवालात देखील ही नदी प्रदूषित असल्याचे म्हटले आहे.उगम परिसरात या नदीचे पाणी स्वच्छ होते. आता कोकाळे गावानजीक पाणी काळेशार झाले आहे. त्यात रासयानिक कारखाने रसायनमिश्रित सांडपाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. वालधुनी नदी पुढे उल्हास नदीला कल्याण खाडीनजीक जाऊन मिळते. त्यामुळे खाडीही प्रचंड प्रदूषित झाली आहे.अंबरनाथ तालुक्यात वालधुनी नदीच्या आसपासच्या गावात फळ, भाजीपाल्याची शेती या पाण्यावर केली जात होती. मात्र, आता हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याला गुरेही तोंड लावत नाहीत. सध्या थोडीफार शेती आहे. नदीचे ते दूषित पाणी फळभाज्यांच्या शेतीला वापरल्यास त्यापासून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नदी उल्हासनगर व कल्याणमध्ये अति प्रदूषित आहे. तेच पाणी पुढे कल्याण खाडीत जाऊन मिळते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेस त्याच्याशी काही देणेघेणे नाही. हा एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, या प्रश्नाला उत्तरच नाही.प्र्रकरण न्यायप्रविष्ट : नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘वनशक्ती’ ही पर्यावरण संस्था २०१३ पासून राष्ट्रीय हरित लवादाच्या माध्यमातून लढा देत आहे. लवादाने नदी प्रदूषित करणाºयांना ९५ कोटींचा दंड ठोठावला आहे. मात्र, हा दंड अद्याप भरला गेलेला नाही. या दंडाच्या रकमेतून नदी प्रदूषण रोखले जाणार होते. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्रदूषण कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणriverनदीthaneठाणे