अंबरनाथ : शिवमंदिराजवळून वाहणारी वालधुनी नदी पुन्हा वाहती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प वालधुनी नदी बचाव समितीतर्फे करण्यात आला. २२ मार्च रोजी जलदिनाच्या मुहूर्तावर विशेष कार्यक्र म घेण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब आॅफ अंबरनाथ ईस्टचे माजी अध्यक्ष देवेंद्र जैन यांच्या कार्यालयात वालधुनी नदी बचाव समितीची गुरुवारी बैठक झाली. यात वरील निर्णय घेण्यात आला. समितीच्या निमंत्रक डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य सरकारने उल्हास आणि वालधुनी नदीसंवर्धनासाठी कार्यक्र म हाती घेतला आहे. वालधुनी नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला, तेथून ही नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराजवळून वाहत होती. मात्र, १९९० च्या दशकापासून अतिक्र मण आणि प्रदूषणामुळे या नदीचे नाल्यात रूपांतर झाले. वालधुनी नदी बचाव समिती पाच वर्षांपासून विविध कार्यक्र म व उपक्र मांद्वारे नदी पुनरु ज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जलपुरु ष डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. हेमंत जगताप, डॉ. सुरेश खानापूरकर आदींनी नदीची पाहणी केली आहे.प्रकल्प आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणारच्२२ मार्च रोजी जलदिन आहे. त्या दिवशी वालधुनी नदी उगमस्थळापासून जलदिंडी काढून प्राचीन शिवमंदिरात अभिषेक करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे वालधुनी नदीच्या उगमापासून पुन्हा वाहती करण्याबाबतचा प्रकल्प आराखडा तयार होत आला आहे.च्हा आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध संस्थांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे सरचिटणीस हेमंत मंडल, वैशाली मंडल, प्रवीण काळे, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.
वालधुनी नदी पुनरुज्जीवित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:21 AM