शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पादचारी पुलामुळे अपघाताला आळा, तुर्भेत रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 3:02 AM

तुर्भेत रविवारी लोकार्पण : सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च

नवी मुंबई : तुर्भे येथील रेल्वे रुळावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. पालिकेच्या निधीतून रेल्वेप्रशासनाने हा पूल बांधला असून, त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च आला आहे. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांकडून रूळ ओलांडण्याच्या होत असलेल्या प्रयत्नात होणारे अपघात थांबणार आहेत.

ट्रान्सहार्बर रेल्वेमार्ग व ठाणे-बेलापूर मार्ग झाल्यापासून जनता मार्केट व तुर्भे नाका परिसर विभागला गेला आहे. या दोन्ही विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरिकांकडून रस्ता तसेच रूळ ओलांडला जात होता. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर पादचारी पूल उभारून रस्ता ओलांडणाºया प्रवाशांची गैरसोय दूर केली होती; परंतु रेल्वेरुळावर पूल नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांचा मृत्यूच्या दाढेखालून प्रवास सुरूच होता.

ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पूल वाढवून तो रेल्वेरुळावरून जनता मार्केटला जोडावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेविका बेबी पाटील यांनी रेल्वे प्रशासनासह पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील यांनीही सदर मागणीवर जोर दिला होता. त्यानुसार खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे प्रशासनाला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती; परंतु केवळ रेल्वे प्रवाशांसाठीच पादचारी पूल अथवा भुयारीमार्ग बांधण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत होते, यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ ओलांडावा लागत होता. याकरिता त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भिंतीलाही भगदाड पाडण्यात आलेले आहे. अखेर पादचारी पुलासाठी लागणारा खर्च देण्याची पालिकेने तयारी दर्शवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला. तर आमदार संदीप नाईक यांनीही अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडून त्या ठिकाणी पादचारी पूल आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.जुलै २०१७ मध्ये पालिकेने रेल्वे प्रशासनाला सहा कोटी ८४ लाख रुपयांच्या निधी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेने पूलाच्या कामाला सुरुवात केली. त्यातही अनेक अडथळे आल्यानंतर अखेर रविवारी त्याचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, प्रभाग समिती अध्यक्षा उषा भोईर, स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, पूजा मेढकर, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, नगरसेवक मनोहर मढवी, निशांत पाटील आदी उपस्थित होते.पालिकेने हटवले झेंडेपुलाच्या कामाच्या श्रेयवादात सुरू असलेल्या चढाओढीतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर शिवसेनेचे झेंडे लावले होते. यावरून परिसरात तणाव निर्माण झाला असता एपीएमसी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त लावला होता. त्यानंतर पालिकेने सदर झेंडे हटवल्यानंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्येच पुलाचे उद्घाटन उरकण्यात आले.खासदारांची उद्घाटनाची वेळ साधलीऐरोली येथील पालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनावेळी शिवसेना व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. खासदार राजन विचारे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने राष्टÑवादीने उद्घाटन उरकल्याने हा प्रकार घडला होता.तुर्भेतील पादचारी पुलाच्या उद्घाटनापूर्वीही श्रेयवादातून राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना असे वातावरण रंगले होते. त्यामुळे या कार्यक्रमास खासदार विचारे वेळेवर पोहोचतील का? याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.तर नियोजित वेळेनुसार महापौरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याच्या तयारीत प्रशासन व सत्ताधारी होते. नेमके त्याच वेळी वाहतूककोंडीत अडकलेली गाडी सोडून खासदार विचारे यांनी पायी चालत येऊन उद्घाटनाची वेळ साधली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMember of parliamentखासदार