ठाणे : भिंत पडून तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी हाजुरी परिसरात घडली. जखमींमध्ये एका तीन वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. तीनही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तर रात्रीपासून सुरू असलेल्या पावसात, २९ झाडे पडली. यात तीन कार, एक बाईक तसेच एका घराचे नुकसान झाले आहे. मशिदीच्या मागच्या मागच्या बाजूला असलेल्या खेरोला चाळीमध्ये हा प्रकार घडला. शकील खान (५०) राजू सुरेश (४५) आणि मोहम्मद फजा (३) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घराचे मालक शदाब सिद्धीक (४२) यांच्या म्हणण्यानुसार भिंतींची कोणत्याही प्रकारची तोडमोड करण्यात आलेली नव्हती. केवळ दुरु स्तीच्या कामामुळे ती कोसळली असल्याचे त्यांनी सांगितले. या चाळीमध्ये तळ अधिक एक मजल्याचे घर असून गॅलरीच्या दुरु स्तीचे काम घराच्या वरच्या मजल्यावर सुरू असताना काहीतरी गडबड झाल्यामुळे भिंत कोसळली असल्याचे सिद्दीकी यांनी सांगतिले. ही चाळ अनधिकृत असून रॅबिट उचलल्याची माहिती पालिकेच्या अधिकाºयांनी दिली.
हाजुरीत भिंत कोसळून तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 2:42 AM