शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रभाग अधिकारी भांगरे वैद्यकीय रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 5:07 PM

कल्याण: २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महासभेने केलेल्या निलंबनाच्या ठरावामुळे चर्चेत आलेले ई प्रभागाचे अधिकारी भागाजी भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील कार्यभार हा ह प्रभागाचे अधिकारी अरूण वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बेकायदा बांधकामांना पाठिशी घालित असल्याच्या आरोपाखाली वानखेडे आधीच वादग्रस्त असताना त्यांना अशा बांधकांमांचे माहेरघर असलेल्या प्रभागाचे अधिकारीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देई प्रभागाचा कार्यभार वादग्रस्त अधिका-याकडे

कल्याण: २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महासभेने केलेल्या निलंबनाच्या ठरावामुळे चर्चेत आलेले ई प्रभागाचे अधिकारी भागाजी भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील कार्यभार हा ह प्रभागाचे अधिकारी अरूण वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बेकायदा बांधकामांना पाठिशी घालित असल्याच्या आरोपाखाली वानखेडे आधीच वादग्रस्त असताना त्यांना अशा बांधकांमांचे माहेरघर असलेल्या प्रभागाचे अधिकारीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.भांगरे यांच्याकडे प्रारंभी जे प्रभागाची जबाबदारी होती. परंतू ई प्रभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांच्यावर बेकायदा बांधकामावरच्या कारवाईत कुचराई केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याची कारवाई माजी आयुक्त पी वेलरासू यांच्यावतीने करण्यात आली. ई प्रभागाच्या रिक्त झालेल्या अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जे प्रभागाचे अधिकारी भांगरे यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान फेब्रुवारीच्या अखेरीस घडलेल्या अपहरण नाटयात भांगरे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून विरोधीपक्षनेते मंदार हळबे आणि भाजपाचे नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचे पडसाद महापालिकेच्या महासभेत उमटले होते. भांगरे यांच्या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेचा निषेध करीत सर्वपक्षिय सदस्यांनी भांगरे यांच्यासह बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि उपायुक्त सुरेश पवार यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. दरम्यान प्रकृती बिघडल्याने भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार ह प्रभागाचे अरूण वानखेडे यांच्याकडे देण्यात आला आहे. वानखेडे हे ह प्रभागाचे अधिकारी आहेत यापुर्वी ते क प्रभागाचे अधिकारी होते त्यावेळी त्यांच्याविरोधात वाढीव आणि बेकायदा बांधकामांना अभय दिल्याच्या अनेक तक्रारी नगरसेवकांकडून करण्यात आल्या होत्या. ह प्रभागात आल्यानंतरही ही परिस्थिती सुधारलेली नाही. आजही या परिक्षेत्रात राजरोसपणे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. आता भांगरे यांचा कार्यभार वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ई प्रभागात सक्षम अधिकारी नियुक्त करणे अपेक्षित असताना वानखेडे यांच्याकडे दिलेली जबाबदारी चर्चेचा विषय ठरली आहे. भांगरे यांच्याकडे जे प्रभागाचा कार्यभार देखील होता त्यामुळे तेथील कार्यभार कर अधिक्षक दिपक शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधला असता भांगरे हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांच्या जागी संबंधित अधिका-यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे कायमस्वरूपी नाही असे सांगण्यात आले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली