शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

तब्बेत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मातदानावेळी उपस्थित नव्हतो; खा. बाळ्या मामा यांचे स्पष्टीकरण

By नितीन पंडित | Updated: April 5, 2025 18:45 IST

माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

नितीन पंडितभिवंडी : तब्येत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मतदानावेळी मी उपस्थित राहू शकलो नाही मात्र विरोधक माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्पष्टीकरण भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे.संसदेत वक्फ बोर्ड निर्णयासंदर्भात झालेल्या मातदानावेळी वक्फ बोर्ड समितीचे सदस्य व भिवंडी लोकसभेचे खा. बाळ्या मामा यांच्या गैरहजेरीबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.त्यावर खासदार बाळ्या मामा यांनी आज स्पष्टीकरण दिले.तब्बेत बारी नसल्याने आपण मातदानावेळी संसदेत हजर राहू शकलो नव्हतो.याच दरम्यान आपण प्रमुख विश्वास्थ असलेल्या कार्ला येथील श्री एकविरा देवी यात्रेच्या बैठकीला देखील हजर नव्हतो,त्यावेळी कार्ला येथील जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये काही समाजकंटकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली होती.याविरोधात आपण भिवंडी पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.याच दिवशी वक्फ बोर्ड बिलाच्या मातदानादिवशी गैरहजर राहिल्याने विरोधकांनी मुस्लिम बांधवांमध्ये माझी बदनामी करण्याच्या हेतूने मेसेज पसरवले,मी वक्फ बोर्ड समितीचा सदस्य असल्याने प्रत्येक वेळी समितीच्या सभेत उपस्थित राहून या बिलाबाबत आमच्या पक्षाची व माझी भूमिका मांडली आहे.केवळ तब्बेत बरी नसल्याने मला या मतदानाला उपस्थित राहता आले नाही.मात्र विरोधकांनी याच बाबीचा फायदा घेऊन माझी बदनामी करून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आपण आपल्या कामांच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देऊ व वक्फ बोर्डाच्या निर्णयासंदर्भात पक्ष व पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतली त्याबाजूने ठाम उभा राहू असेही खा बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.