ठाणे - स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्र मांकावर असलेला रँक ४० वर आला असला तरी, यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी आता ठाणे महापालिकेने महत्वाची पाऊले उचलण्यास सुरु वात केली आहे. ठाणे शहराच्या मुख्य रस्त्यांची सफाई दिवसा होत असली तरी, रात्रीच्या स्वच्छतेसाठी देखील या अभियानामध्ये गुण असल्याने आता मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांची सफाई आता रात्रीच्या सत्रात करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी खाजगी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यामुळे आता दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा होणार आहे. गेल्या वर्षी ठाणे शहराचा स्वच्छतेमधला रँक हा १६६ व्या क्र मांकावर होता. मात्र यावर्षी ठाणे शहराचा रँक हा ४० वर आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून सकाळ आणि नंतरच्या किंवा रात्रीच्या सत्रात सुध्दा मार्केट परिसराला लागून असलेल्या किंवा वाणिज्य आस्थापना असलेल्या मुख्य रस्त्यांची सफाई करणे आवश्यक असून यासाठी विशेष गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता रात्रीच्या सत्रात देखील या मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. ठाणे महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १२८ चौ. मी. आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या आहे. ठाणे शहरात दररोज ४ लाख नागरिकांची ये - जा सुरु असते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील रत्स्यावर निर्माण होणाऱ्या कचºयामध्ये देखील वाढ होत आहे. ठाणे महापालिकेकडे कायस्वरूपी २२१२ सफाई कामगार आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार कामगारांची ही संख्या अपूर्ण असल्याने सकाळच्या सत्रात मुख्य रस्त्यांची सफाई करण्यासाठी खाजगी संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला असला तरी आता स्वच्छ भारत अभियानामधला रँक वाढवण्यासाठी रात्रीच्या सत्रामध्ये देखील वाणिज्य आस्थापना असलेल्या मुख्य रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. रात्रीच्या सत्रात काम करण्यासाठी खाजगी कामगारांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक खर्च ४ कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च आता महासभेच्या मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. हा ठेका वर्षभरासाठी दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. खाजगीकरणातून रस्ते सफाई या लेखा शीर्षकांतर्गत यासाठी निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या रँकमध्ये सुधार करण्यासाठी आता रात्रीही होणार मार्केट परिसरातील मुख्य रस्त्यांची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 5:39 PM
स्वच्छतेचा रँकमध्ये सुधार करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता शहरातील मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांचीसुध्दा धुलाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्दे४ कोटी ८४ लाखांचा खर्च अपेक्षितप्रस्तावाला महासभेत मिळाली मंजुरी