शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

ओल्या कचऱ्यावरील पालिकेचा खत प्रकल्प सुरू, ५५० टन क्षमतेचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:50 AM

भार्इंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे ओल्या कचºयापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १६ मे पासून जे नागरिक वा गृहनिर्माण संस्था ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

भार्इंदर : मीरा - भार्इंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे ओल्या कचºयापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १६ मे पासून जे नागरिक वा गृहनिर्माण संस्था ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. घनकचरा अधिनियमानुसार नागरिकांवर कारवाई करण्यासह नळजोडण्या खंडित करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. काही भागातील कचरा उचलणे बंद केले असता नगरसेवक आडकाठी आणत असल्याने त्यांचीही नोंद पालिका ठेवणार आहे.राज्य शासनाने उत्तनच्या धावगी डोंगरावर घनकचरा प्रकल्पासाठी तब्बल साडे एकतीस हेक्टर जमीन पालिकेला फुकट दिली आहे. गेली १२ वर्षे पालिकेने येथे बेकायदा कचरा डंपिंग चालवल्याने स्थानिकांमध्ये असंतोष आहे. कचºयाचे डोंगर निर्माण झाले आहेत, तसेच पाणी प्रदूषित होऊन शेती नापीक झाली आहे. दुर्गंधी, आग लागून होणारा धूर यांमुळे आरोग्याचा प्रश्न बिकट असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे प्रकल्पाच्या जागेत राजरोस झालेल्या अतिक्रमणाकडे पालिकेने डोळेझाक चालवली आहे.हरित लवाद तसेच न्यायालयाकडून महापालिकेला तंबी मिळाल्यानंतर आयआयटीच्या मार्गदर्शनाखाली कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कागदावर तो ३५० टनाचा असला तरी त्याची क्षमता मात्र ५५० टनाची असल्याचे पालिका अधिकारी सांगतात. सध्या रोज सुमारे ६० - ७० टन सुक्या कचºयावर प्रक्रिया करून बॉयलर, सिमेंट प्लांटसाठी लागणाºया आरडीएफ नावाच्या इंधनाच्या विटा तयार केल्या जात आहेत. कचºयाचे पूर्ण वर्गीकरण झाले तर आणखी ७० टन सुक्या कचºयावर प्रक्रिया होणार आहे.ओल्या कचºयापासून खत बनवण्याचा प्रकल्प सुध्दा या ठिकाणी सुरू करण्यात आला असला तरी वर्गीकरण करून कचरा येत नसल्याने सध्या नाममात्र ओला कचराच खत बनवण्यासाठी वापरला जात आहे. ओल्या कचºयावर प्रक्रिया १० दिवसांपासून सुरू केली आहे. रोजच्या सुमारे १० - १५ गाड्या ओला कचरा हा खत प्रकल्पासाठी तयार केलेल्या वाफ्यात टाकला जातोय. आयुक्त बालाजी खतगावकर आणि कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता किरण राठोड, स्वच्छता निरीक्षक प्रकाश पवार आदी प्रकल्प सुरू करण्यापासून काम पहात आहेत.शहरातील सर्वच्या सर्व ५५० टन कचºयावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करायची असल्यास ओला आणि सुक्या कचºयाचे वर्गीकरण अत्यावश्यक असल्याने पालिकेने पुन्हा कारवाईचा इशारा दिला आहे.लोकप्रतिनिधींचा खोडा नकोपालिका आतापर्यंत ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांवर कारवाईच्या पोकळ वल्गनाच करत आली आहे. त्यातही कचरा उचलला नाही तर लोकप्रतिनिधींकडून दबाव येतो आणि शेवटी कचरा उचलावा लागतो. नागरिकांची जबाबदारी असताना लोकप्रतिनिधी देखील त्यात खोडा घालत असल्याने आतापर्यंत कचरा वर्गीकरण बारगळले आहे. पण प्रकल्पासाठी कचरा वेगळा असणे आवश्यक असल्याने आता नगरसेवकांना देखील पालिकेने सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारवाईदरम्यान आडकाठी आणणाºया नगरसेवकांची माहिती थेट पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे दिली जाणार आहे.५५० टन क्षमतेचा प्रकल्प असून सुक्या कचºयावर प्रक्रिया सुरू आहे. ओल्या कचºयाचा प्रकल्प सुरू केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची जबाबदारी घनकचरा अधिनियमानुसार कचरा निर्माण करणाºया नागरिकांची आहे. गेली ३ ते ४ वर्ष पालिका लोकांना सातत्याने आवाहन करते आहे. जनजागृती, गृहनिर्माण संस्थांच्या बैठका, नोटीसा इतकेच काय तर मोफत डबेसुध्दा पालिकेने दिले आहेत. तरीही कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने १६ मे पासून वेगळा न केलेला कचरा उचलला जाणार नाही. त्यांच्या नळ जोडण्या खंडित करू तसेच अधिनियमानुसार कारवाई करू. - डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर