शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

गणरायाला सुरक्षेचे कवच, राज्य राखीव पोलीस, गृहरक्षक दलासह सीसीटीव्हीचीही ‘नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:52 PM

राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्या, ७०० गृहरक्षक दलाचे जवान, खासगी सुरक्षा रक्षक मंडळांचे कार्यकर्तेही आणि ५०० हून अधिक पोलीस मित्र अहोरात्र सार्वजनिक गणेश मंडळांना सुरक्षा देत आहेत.

जितेंद्र कालेकरठाणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्या, ७०० गृहरक्षक दलाचे जवान, खासगी सुरक्षा रक्षक मंडळांचे कार्यकर्तेही आणि ५०० हून अधिक पोलीस मित्र अहोरात्र सार्वजनिक गणेश मंडळांना सुरक्षा देत आहेत. स्वयंसेवकांबरोबरच सीसीटीव्हीचीही करडी नजर राहणार असल्याची माहिती गणेश मंडळांनी ‘लोकमत’ला दिली.

श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या १२ दिवसांतील उत्सव कालावधी आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक अशा दोन ते तीन टप्प्यांमध्ये मंडळांनी आपआपल्या मूर्तीची काळजी घ्यावी. विशेषत: मूर्तीं आणि समईची काळजी घ्या. मूर्ती संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची डयूटी नेमावी. ध्वनी प्रदूषण टाळावे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा वापर करा. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, दर्शनाला येणाºया महिलांसह सर्व भाविकांनाही सुरक्षा मिळण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमावेत, मंडपामध्ये कार्यकर्त्यांकडून सतत निगराणी ठेवावी. अशा अनेक सूचना सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या काळात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राज्याच्या पोलीस मुख्यालयातून जादा कुमक मागविण्यात आली आहे. याशिवाय, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या (एका कंपनीत १०० जवानांची कुमक), आउ उपायुक्त, १५ सहाय्यक पोलीस आयुक्त, ११३ निरीक्षक, २९६ उपनिरीक्षक तसेच सहायक निरीक्षक, ३० महिला उपनिरीक्षक, तीन हजार १६८ पुरुष तर ८३४ महिला कर्मचारी ७०० गृहरक्षक दलाचे जवान असा मोठा पोलीस बंदोबस्त गणेश उत्सवासाठी ठेवण्यात आला आहे. याशिवाय, नाकाबंदी, दिवसा रात्रीची गस्त, मंडळांना अचानक भेटी तसेच काही ठिकाणी गरज पडल्यास बॉम्ब शोधक नाशक पथकाकडूनही तपासणी केली जाणार आहे. कोणत्याही गंभीर घटनेच्या अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी मंडळांच्या बैठकीत केले.ठाण्यात नावारुपाला आलेल्या तसेच वेगळी कलाकृती मांडण्यात प्रसिद्ध असलेल्या पाचपाखाडीतील नरवीर तानाजी मित्र मंडळाने सुरक्षेसाठी सुमारे दहा सीसीटीव्ही गणेश मंडपाच्या सभोवताली आणि आतील भागात लावले आहेत. याशिवाय, चार खासगी सुरक्षारक्षक, २४ तास कार्यकर्त्यांचा राबताही याठिकाणी असल्याचे मंडळाचे पदाधिकारी उदय मोरे यांनी सांगितले.खेवरा सर्कल येथील मनोमय फाऊंडेशनच्या सार्वजनिक गणेश मंडळातही सहा सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी चार सुरक्षा रक्षक आणि २० ते ४० कार्यकर्त्यांची टीम सुरक्षेसाठी काही तासांच्या अंतराने तैनात ठेवल्याचे मंडळाचे सल्लागार माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे आणि खजिनदार किर्ती पटेल यांनी सांगितले. याशिवाय, आग प्रतिबंधासाठी वाळूच्या बादल्या, अग्निप्रतिबंधक सिलेंडर्सही ठेवण्यात आहे आहेत.वाहतूक नियंत्रणाचीही शिस्तखोपटच्या आशिर्वाद सार्वजनिक गणेश मंडळाने सुरक्षेसाठी चार सीसीटीव्ही लावले आहेत. १५ स्वयंसेवकांचा गट तयार करुन वाहतूकीला अडथळा न होण्यासाठी उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांकडून वाहतूक नियंत्रण करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष हेमंत वाणी यांनी सांगितले. यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती बसविण्यात आली असून तिच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यकर्त्यांचा राबता ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार रविंद्र फाटक यांच्या हिरामोतीनगर मित्र मंडळात आणि कोलबाड मित्र मंडळाच्या ‘कोलबाडच्या राजा’ची, नौपाडयातील नवतरुण मित्र मंडळ, पोलीस मुख्यालय, आणि महागिरीतील एकविरा मित्र मंडळाकडूनही सुरक्षेची अशाच प्रकारे खबरदारी घेण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.छेडछाड विरोधी पथक तैनातउत्सव काळात महिला आणि पुरुषांच्या वेगळया रांगा करण्याच्या सूचना पोलिसांकडून मंडळांना दिल्या आहेत. पोलीस आणि पोलीस मित्रांचा समावेश असलेले छेडखानी विरोधी पथक, ५ दंगल नियंत्रण पथकेही तैनात केल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. तर महिला स्वयंसेवकांबरोबर १५० जीवन रक्षक विसर्जनासाठी तैनात केले असून तर दोन ते तीन तासांनी पोलिसांची गस्त सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी ठेवून सुरक्षेची पाहणी करण्यात येत असल्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPoliceपोलिस