ठाणे : भिवंडी व मीरा-भार्इंदर महापालिका व जिल्हा परिषदेच्या ४२ गावांचा पाणीपुरवठा आगामी शनिवार, रविवारी बंद करण्यासाठी शहाड टेमघर प्राधिकरण सज्ज झाले आहे. त्यांच्या अधिकारातील ठाणेकरांचे पहिल्या दिवसाचे पाणीदेखील ते बंद करणार आहेत. परंतु, ठाणे मनपा तिच्या हक्काचे पाणी रविवारी देऊन ठाणेकरांवर केवळ एक दिवसाची पाणीकपात लावणार आहे.जिल्ह्यातील सर्व महापालिकाना शनिवार, रविवार या दोन दिवसांची पाणीकपात लघूपाटबंधारेने एकाच वेळी लागू केली आहे. या कालावधीत पाणी उचलण्यास त्यांनी सक्तीची मनाई केली आहे. या आदेशाचे पालन करून टेमघरद्वारे या कालावधीत पाणीपुरवठा करण्याचेच बंद केले आहे. यामुळे भिवंडी महापालिकेचा ६७ दश लक्ष लिटर, मीरा-भार्इंदरचा ११३ दश लक्ष लिटरचा प्रति दिवसाचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण केली.याप्रमाणेच ठाणे महापालिकेला होणारा १७० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा टेमघर त्याच्या अधिकारात शनिवारी बंद ठेवणार आहे. पण स्वत:च्या योजनेच्या हक्काचा पाणीपुरवठा रविवारी ठाणे महापालिका ठाणेकरांना करणार आहे. रविवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात महापालिका यशस्वी ठरली आहे.
ठाण्यात फक्त रविवारी पाणी बंद
By admin | Published: February 03, 2016 2:13 AM