शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

ठाण्याला भेडसावतेय पाणीबाणीचे संकट

By admin | Published: July 08, 2015 10:23 PM

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस

ठाणे : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा आटू लागला आहे. त्यामुळेच महापालिकेने ठाणेकरांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. एमआयडीसी आणि स्टेमचा पाणीसाठा हा १३ टक्क्यांवर आला असून शहराला जेमतेम २० ते २५ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्राधिकरणाकडून शहरात अनेक ठिकाणी पाणीकपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे आहेत. तर पालिकेच्या स्वत:च्या योजनेत दोन महिन्यांचा साठा शिल्लक असल्याने शहरातील काही भागांवर फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाण्याला आज विविध स्रोतांच्या माध्यमातून ४७२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचे हे प्रमाण २२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ४शहरात आजघडीला ४५ टक्के पाणीगळती असल्याचे पालिकेने मान्य केले असून पाणीनियोजन आणि वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने ठाणेकरांना आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यातच, डिसेंबरपासून महापालिका हद्दीत १४ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. ४एक आठवडा ठाणे शहर आणि दुसरा आठवडा कळवा, मुंब्रा, दिवा अशा पद्धतीने १४ टक्के कपात केली जात आहे. परंतु, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे पालिकेमार्फत केली जाणारी पाणीकपात दोन आठवडे केली नव्हती. ४आता पावसाने दडी मारल्याने ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. शहरातील काही भाग वगळल्यास उर्वरित भागांना ती अधिक जाणवणार आहे. यात स्टेम, एमआयडीसीकडून कळवा, मुंब्रा, विटावा, दिवा, बाळकुमचा काही भाग, पडलेगाव, गणपतीपाडा, आतकोनेश्वरनगर, वाघोबानगर आदी भागांना फटका बसणार आहे.